शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

तीस वर्षांत झाल्या तेरा पोटनिवडणुका

By admin | Updated: January 8, 2015 01:06 IST

महापालिकेची स्थापना झाल्यापासून शहरामध्ये आतापर्यंत पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यातील अनेक निवडणुका वेगवेगळ््या कारणासाठी गाजल्या आहेत.

पिंपरी : महापालिकेची स्थापना झाल्यापासून शहरामध्ये आतापर्यंत पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यातील अनेक निवडणुका वेगवेगळ््या कारणासाठी गाजल्या आहेत. १४ वी पोटनिवडणुक अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे वार्ड क्र. ४३ अ मध्ये १८ जावेवारी २०१५ रोजी होत आहे. महापालिकेच्या निवडणुक विभागातून मिळालेल्या माहितीवरुन महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९८६ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणुक झाली. त्यांतर ६ सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. तर १३ पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यामध्ये पदावर असताना नगरसेवकाचा मृत्यू तर जातीचा दाखला अवैध ठरणे, दोन नगरसेवकांच्या हत्या तर काही जणांनी राजीनामा दिल्यामुळे पोटनिवडणुका झाल्या आहेत. पहिली पोटनिवडणूकही १९८६ मध्येच झाली आहे. त्यानंतर अनेक पोटनिवडणूका झाल्या आहेत. कोणत्याही कारणास्तव पद सोडावे लागले तरी नियमानुसार ६ महिन्यांच्या आता पोटनिवडणुक घ्यावी लागते. त्यासाठी ही प्रभागापुरती आचारसंहिता असते. त्यामुळे निवडणुका रंगतदार होतात. कारण एकाच ठिकाणी निवडणुक असल्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष वा राजकीय व्यक्ती त्याकडे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे त्यामध्ये अधिकच रंगत असते. दोन नगरसेवक आमदार झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिली. आमदार झाल्यामुळे आपला उमेदवार निवडूण आणन्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकत पणाला लावली होती. तर त्यांच्या विरोधकांनीही त्यांचा उमेदवार पाडण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यामुळे त्या निवडणुका अतिशय रंगतदार व चर्चेच्या ठरल्या होत्या.शहरात आतापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये संबंधीत व्यक्तीचे राजकीय वारसदार विजयी झाले आहेत. किंवा सरासरी त्याच पक्षाच्या उमेदवाराचा वरचष्मा राहिलेला दिसून योतो. कारण निवडुन येणाऱ्या उमेदवाराचा त्या विभागात प्रभाव असतो. त्यामुळे त्यांनी ज्या व्यक्तीला पाठिंबा दिला तीच व्यक्ती साधारणपणे निवडून येते. मात्र, काही वेळा विरोधकही या निवडणुका जिंकलेले आहेत. निवडणुकीत खोटे जात प्रमाणपत्र जोडून अनेकवेळा मतदारांची फसवणूक केली जाते. हे समोर आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशामुळे पद सोडलेले असले तरी त्या व्यक्तीची राजकीय ताकत तिच असते. त्यांचाही पोटनिवडणुकीवर प्रभाव असतो. शहरातील विविध पोटनिवडणुकिमध्ये पक्षाचा विचार केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा वरचष्मा राहिल्याचे दिसून येते. त्यामध्ये या पक्षाला जास्त जागा मिळालेल्या आहेत. तर भाजप, शिवसेना, हे पक्ष शहरातील पोटनिवडणुकीमध्येही मागे पडले असल्याचे दिसून आले आहे. १९८६ मध्ये फकीरभाई पानसरे यांचे निधन झाल्यामुळे आझमभाई पानसरे येथून निवडूण आले. १९९७ मध्ये अनिल उर्फ बाळकृष्ण हेगडे यांची हत्या झाल्यामुळे पोटनिवडणुक झाली. त्या ठिकाणी प्रतीक झुंबरे हे विजयी झाले होते. २००६ मध्ये अंकुश कोकणे यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणुक झाली त्या ठिकाणी त्यांचा मुलागा संतोष कोकणे विजयी झाले आहेत. आमदार म्हणून निवडूण आल्यामुळे विलास लांडे २००५ मध्ये यांनी राजीनामा दिला. त्यावेळी महेश लांडगे निवडुन आले. गोस्वामी मोहन बाबूलाल यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे प्रभाग ३० मध्ये पोटनिवडणुक झाली. तेथे रामाधार धारीया निवडुण आले होते. श्रीरंग आप्पा बारणे यांनी २००९ मध्ये राजीनामा दिल्यामुळे पोटनिवडणुक झाली. शैलेजा धाडगे २००२ मध्ये मृत्यू झाल्यामुळे येथे पोटनिवडणुक झाली. तेथून स्मिता कुलकर्णी निवडुण आल्या. संजय काळे यांची १९९२ मध्ये हत्या झाल्यामुळे पोटनिवडणुक झाली. त्यावेळी तेथून काळे यांचे भाऊ राजेंद्र काळे निवडुण आले होते. भिकू वाघेरे पाटील महापौर असताना मृत्यू पावले. त्याच्या ठिकाणी त्यांचा मुलगा संजोग वाघेरे निवडुण आले. (प्रतिनिधी)जात प्रमाणपत्र अवैध४१९९७ मध्ये महापौर मधुकर पवळेयांचे निधन झाल्यामुळे निवडणुक झाली. त्यावेळी दत्ता पवळे निवडुण आले होते. अशोक कदम २००३ मध्ये जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे निवडणुक झाली त्यावेळी इश्वर ठोंबरे हे विजयी झाले होते. सुजीत पाटील २००५ मध्ये जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे निवडणुक झाली. त्यावेळी शरद बारहाते निवडुण आले. २०१२ मध्ये भोसरीतील सिमा फुगे यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे निवडणुक झाली. येथून श्रद्धा लांडे विजयी झाल्या आहेत.