शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव विमानतळ प्रवासीसेवेत तिसरे, ५० लाख ते दीड कोटी प्रवासीसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:47 IST

लोहगाव विमानतळाने वार्षिक ५० लाख ते दीड कोटी प्रवासी संख्या असणाºया विमानतळांच्या यादीत तिसरे स्थान पटकाविले आहे. ‘जागतिक दर्जाची सेवा’ या निकषावर एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलने ही निवड केली आहे.

पुणे - लोहगाव विमानतळाने वार्षिक ५० लाख ते दीड कोटी प्रवासी संख्या असणाºया विमानतळांच्या यादीत तिसरे स्थान पटकाविले आहे. ‘जागतिक दर्जाची सेवा’ या निकषावर एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलने ही निवड केली आहे.प्रवाशांच्या पसंतीनुसार संबंधित विमानतळाचा सेवा दर्जा ठरविला जातो. या वर्षी पुणे विमानतळातून ८० लाख प्रवासी उड्डाण करतील. इतक्या मोठ्या प्रमाणावरील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी विमानतळ-अधिकारी आणि कर्मचाºयांबरोबरच भारतीय वायुदल, कस्टम, इमिग्रेशन, टॅक्सी सेवा देणारे, पीएमपी बससेवा यांचादेखील तितकाच सहभाग असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.हैदराबाद विमानतळाने या प्रकारात सलग चौथ्यांदा पहिला क्रमांक पटकाविण्याची कामगिरी केली आहे. इंडोनेशियाचा बालिकपापन आणि मंगोलियाच्या होहॉट बैता इंटरनॅशनल एअरपोर्टने संयुक्त दुसरे स्थान मिळविले आहे. तर, पुण्याने कोचीन आणि कोलकता एअरपोर्टसह संयुक्त तिसरे स्थान मिळविले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवाशांची वाढती संख्या, गरज आणि मागणी लक्षात घेऊन सातत्याने पुणे विमानतळाच्या सेवेत सुधारणा करण्यात येत आहेत. त्यामुळे विमानतळाच्या गुणांकनामध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. पुणे विमानतळाला २०१६मध्ये ४.७८ गुणांकन होते. त्यात डिसेंबर २०१७ मध्ये ४.८० पर्यंत वाढ झाली. या पुढील उच्च श्रेणी ही ४.८५ असून, त्या पुढील श्रेणी ५ गुणांकाची असते.विमानतळ सेवा दर्जा (एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी) हे जगभरात राबविले जाणारे अभियान आहे. हा दर्जा ठरविताना विविध प्रकारच्या ३४ बाबी ध्यानात घेतल्या जातात. विमानतळाला पोहोचण्याच्या सोयी-सुविधा, सुरक्षा योजना, शयनगृह, रेस्टॉरंट आणि इतर सोयीसुविधांचा विचार या वेळी केला जातो.

टॅग्स :AirportविमानतळPuneपुणे