शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर त्यांना हक्काचे घर मिळेल! प्रस्ताव तयार करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:36 IST

गुळुंचे (ता. पुरंदर) येथील सरकारी जागेवरील निवासी पात्र अतिक्रमण शासनाच्या धोरणाप्रमाणे नियमित करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मंगळवारी उपजिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी मंडल अधिकारी, तलाठी तसेच ग्रामसेवक यांना मंगळवारी दिले.

नीरा : गुळुंचे (ता. पुरंदर) येथील सरकारी जागेवरील निवासी पात्र अतिक्रमण शासनाच्या धोरणाप्रमाणे नियमित करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मंगळवारी उपजिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी मंडल अधिकारी, तलाठी तसेच ग्रामसेवक यांना मंगळवारी दिले. याची अंमलबजावणी झाली, तर त्यांना हक्काचे घर मिळू शकेल.गुळुंचे गावातील सरकारी गायरान जागेवरील वडिलोपार्जित अतिक्रमणांच्या नियमितीकरणासाठी सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला त्यामुळे शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. येथील अतिक्रमण नियमित करून त्याची गाव नमुना १ इ रजिस्टरला नोंद घेण्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शाखाध्यक्ष अक्षय प्रदीप निगडे, काँग्रेस पक्षाचे नीरा गटाचे उपाध्यक्ष नितीन निगडे तसेच उमाजी नाईक ट्रस्टचे अध्यक्ष संजय चव्हाण व इतर सुमारे ५० जणांनी नुकताच प्रांत कार्यालयापुढे सत्याग्रह केला.या वेळी केलेल्या गांधीगिरीने खडबडून जागे होऊन प्रशासनाने मंगळवारी सासवड येथे बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी तहसीलदार सचिन गिरी, पंचायत समितीचे अधिकारी श्रीयुत मोरे, मंडल अधिकारी वीरकुमार गायकवाड, तलाठी श्रीकांत अलोनी यांसह महसूल व पंचायत समितीचे विविध अधिकारी, अक्षय निगडे, नितीन निगडे, संजय चव्हाण उपस्थित होते. या वेळी वरील आदेश देण्यात आले.या वेळी अक्षय निगडे म्हणाले, की राज्य शासनाने ४ एप्रिल २००२ रोजी १९९५पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्याचा, १४ मार्च २०१८ रोजी गावठाणांची हद्द २०० मीटरनी वाढविण्याचा, १६ फेब्रुवारी २०१८ रोजी १ जानेवारी २०११ पूर्वीचे निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा, ३ आॅगस्ट २०१८ रोजी घरकुलांना सरकारी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय काढला. अतिक्रमणांच्या नोंदी घेण्यासाठी नुकतेच अ‍ॅप विकसित केले आहे, तर मग केवळ कागदांवर खर्च करायचा म्हणून हे निर्णय काढले आहेत का? असा सवाल त्यांनी केला. प्रांत तसेच तहसीलदारांच्या आजच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे निगडे यांनी सांगितले.पात्र अतिक्रमणे नियमित करण्याबाबत प्रशासकीय पातळीवरून कार्यवाही सुरू आहे. प्रस्ताव तयार करून योग्य धोरण ठरवून त्यावर कार्यवाही केली जाईल, असे पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी सांगितले.शासन निर्णयाप्रमाणे गावातील अतिक्रमणांचे प्रस्ताव ग्रामसेवकांनी तयार करावेत. त्यांना तलाठ्यांनी मदत करावी. १ इ ला नोंदी असणारे व नसणारे असे स्वतंत्र प्रस्ताव तयार करावेत. गुळुंचे गावातील अतिक्रमण विषयाला प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या सर्व धोरणांचा विचार करून २१ आॅगस्ट रोजी पुन्हा बैठक आयोजित केली जाईल.- विजय देशमुख , उपजिल्हाधिकारीपुरंदर व दौंड या तालुक्यांतील अतिक्रमणांच्या विषयाला वाचा फुटली असून, त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील पात्र निवासी अतिक्रमणे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाल्यास अनेकांना त्यांच्या हक्कांचे घर मिळू शकेल. त्यामुळे प्रांत संजय असवले यांनी हा विषय गांभीर्याने घेतल्याने त्यांचे आभार मानण्यात आले.

टॅग्स :Homeघरnewsबातम्या