शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...ते म्हणतात औषध बाहेरून घ्या"; सामान्यांच्या व्यथा, पुणे महापालिकेच्या दवाखान्यात औषधांचा खडखडाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 13:23 IST

डाॅक्टरांनी रुग्णांना चार ते पाच दिवसांचे औषध लिहून दिलेले असताना त्यांना केवळ एक ते दाेन दिवसांचे औषधे दिले जात आहेत

पुणे : महापालिकेच्या सर्वच दवाखान्यात औषधांचा खडखडाट झाला आहे. डाॅक्टरांनी रुग्णांना चार ते पाच दिवसांचे औषध लिहून दिलेले असताना त्यांना केवळ एक ते दाेन दिवसांचे औषधे दिले जात आहेत. उर्वरित औषधे बाहेरून खरेदी करायला सांगितले जात आहेत. औषध खरेदीसाठी निधी कमी पडल्याचे कारण दिले जात असले तरी वर्षेनुवर्षे एकाच ठेकेदाराकडे औषधाचे टेंडर असल्याने औषध वितरणात तक्रारी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.पुणे शहरात महापालिकेचे ४१ बाह्यरुग्ण विभाग म्हणजेच ओपीडी आहेत. त्याचबराेबर १८ प्रसूतीगृहे, कमला नेहरू व नायडू असे दाेन जनरल दवाखाने मिळून शहरातील लाखाे रुग्णांना सेवा देण्यात येते. महापालिकेच्या दवाखान्यात दरराेज ८ ते ९ हजार रुग्ण येऊन उपचार घेत असतात. तर वर्षाला २५ लाख रुग्ण येत असतात. या ओपीडी मधील औषधांसाठी दरवर्षी ६ काेटी रुपयांची औषधांची खरेदी करण्यात येते.

‘सीएचएस’वर मेहेरबानी

शहरी गरीब मधील २१ हजार कुटुंबांना माेफत औषधे देण्यात येतात. तसेच सीएचएस याेजनेत असलेल्या महापालिकेच्या आजी माजी कर्मचारी व अधिकारी ज्यांची संख्या २० हजारांच्या आसपास आहे त्यांनाही माेफत औषधे देण्याची तरतूद आहे. या दाेन्ही घटकांना पुरेसा औषधांचा पुरवठा हाेताे परंतु, ओपीडीमध्ये येणाऱ्या सर्वसामान्यांना औषधे मात्र दिले जात नाहीत. शहरी गरीब व सीएचएस मधील रुग्णांना मात्र औषधे कमी पडू दिले जात नाहीत. कारण सर्वसामान्यांच्या तक्रारींना काेणी जुमानत नाहीत. मात्र,या दाेन्ही घटकांच्या तक्रारींची दखल घेऊन ठेकेदार खास ‘तजवीज’ करत असल्याचे दिसून येते.

सामान्यांची व्यथा

गेले दाेन दिवस झाले वडगावच्या मनपा हाॅस्पिटलमध्ये औषधे मागत आहे. मात्र, पुरेसी औषधे मिळत नाहीत. बाहेरून औषधे आणायला सांगितले जाते. औषधे नसली की मग दवाखाने फी मात्र कमी घेत नाही. औषधे तर मिळत नाहीत, असे एका रुग्ण महिलेने सांगितले.

''सध्या औषधांसाठी निधी कमी पडला आहे. आणखी ४ कोटी वर्गीकरण प्रस्ताव टाकला आहे. दरवर्षी औषधांसाठी २६ काेटी रुपयांचा निधी देण्यात येताे. टेंडरद्वारे महापालिका स्वतः खरेदी करते आणि रुग्णांना देते. ७ ते ८ हजार डिलिव्हरी वर्षाला माेफत हाेतात. त्यांनाही औषधे देण्यात येतात. तर, महिन्याला दीड हजार इंजेक्शन रेबीजचे लागतात. आराेग्यासाठी एकूण बजेटच्या ५ टक्के बजेट मिळायला हवे, जे आता २ टक्क्यांच्या आसपास मिळते. - डाॅ. संजीव वावरे, सहायक आराेग्य अधिकारी, पुणे मनपा''

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर