शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
3
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
4
गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
5
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
6
Kitchen Tips: फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड, हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स!
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपिचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
8
मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश
9
मुलींकडील आयपॅड काढून घेतले, अभ्यास करायला सांगितले, आईची थेट तुरुंगात रवानगी, पोलिसांनी केली कारवाई 
10
IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?
11
"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान   
12
"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल
13
धमाल! आता WhatsApp वर तुम्ही ठेवू शकता मोठं स्टेटस; १ मिनिटाची लिमिट कितीने वाढवली?
14
आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका
15
डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट
16
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी 
17
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीपासून ॐकार साधना सुरू करा आणि अगणित लाभ मिळवा!
18
१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या
19
तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या
20
दीड लाखाचे व्याज माफ, म्हाडाचा निकाल; बिल्डरने आकारलेली वाढीव रक्कम रद्द करण्याची सूचना

संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरे काम नाही : श्रीपाल सबनीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 14:22 IST

..ते सुद्धा जातीयवादीच आहेत,असे टीकास्त्र डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डाव्यांवर सोडताना याचा अर्थ संघ गोंजारण्यासारखा किंवा पुजण्यासारखा आहे असा होत नाही अशी सावधपणाची भूमिकाही त्यांनी घेतली. 

ठळक मुद्देहिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन एक प्रबोधनात्मक मंथन’ या  पुस्तकाच्या प्रकाशनइतिहासाचे विकृतीकरण, महापुरुषांचे अपहरण सुरु

पुणे : उजव्या चळवळीच्या व्यक्ती जातीयवादी आहेतच.पण डावे देखील धुतल्या तांदळ्यासारखे नाहीत. ते सुद्धा जातीयवादीच आहेत. म्हणूनच परिवर्तनाची चळवळ पुढच्या टप्प्यापर्यंत जात नाही. ही चळवळ पुढे जात नसल्याने संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरा धंदाच उरलेला नाही, अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डाव्यांवर टीकास्त्र सोडले. मात्र याचा अर्थ संघ गोंजारण्यासारखा किंवा पुजण्यासारखा आहे असा होत नाही अशी सावधपणाची भूमिकाही त्यांनी घेतली. ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत रा.ना चव्हाण यांच्या १०५व्या जन्मदिनानिमित्त रा.ना चव्हाण प्रतिष्ठान वाई आयोजित ' हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन एक प्रबोधनात्मक मंथन’ या  पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी  माजी आमदार उल्हास पवारहोते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरप्रणाली अभ्यास केंद्राचे प्रमुख  डॉ. राजा दीक्षित पत्रकार संजय आवटे , अँड शारदा वाडेकर, प्रतिष्ठानचे विश्वस्त रमेश चव्हाण  उपस्थित होते. सबनीस यांनी रा.ना चव्हाण यांच्या हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटनाच्या वैचारिक लेखनाचा धांडोळा घेताना संघाची निती, विचारसरणीवरही भाष्य केले. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने हिंदू हा धर्म नसून, जीवनप्रणाली आहे आणि ती भारतीयांशी सुसंगत आहे,असा  निकाल दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदू या शब्दाचा गैरवापर करून भाजपप्रणित हिंदुत्ववादी संघटनांनी बहुसंख्येच्या बळावरती धर्मनिरपेक्ष हा शब्द बाजूला केला. हिंदू शब्द घुसडवून हा हिंदूचांच देश असल्याचे भासवत हिंदू धर्म आधारित राज्यघटना आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत., म्हणून मुस्लिमांचा विटाळ आता न मानण्याची संघप्रमुख मोहन भागवत यांची सुधारणावादी भूमिका ,रामजन्मभूमीच्या निमित्ताने कायदा करून तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही याची पूर्ण खात्री असताना २०१९ ची निवडणूक लढविण्याची चाललेली धडपड या गोष्टी दिसत आहेत.  पण रा.ना चव्हाण यांचे हिंदुत्व यापेक्षा खूप वेगळे आहे. रा.ना चव्हाण यांचा समृद्ध वारस निर्माण होण्याची गरज आहे.     डॉ. राजा दीक्षित म्हणाले, आजच्या टप्प्यावर अतिरेकी आणि राजकीय हिंदुत्वाला यश आणि जनाधार मिळाला आहे. हे अस का झाले याची वस्तुनिष्ठ कारणमीमांसा हिंदुत्ववाद्यांकडून व्हायला हवी तर विरोधकांकडून ठोस कृतीतील विचार अपेक्षित आहे. दोन्हींकडून आत्मपरीक्षणाची गरज आहे. ज्यामध्ये दोघेही कमी पडत आहे. हे आत्मपरीक्षण योग्य झाले तर भारतचे धार्मिक भवितव्य चांगले आहे अन्यथा ते चिंताजनक आहे.इतिहासाचे विकृतीकरण, महापुरुषांचे अपहरण चालू आहे. ऐतिहासिक असाक्षरता पाहायला मिळत आहे.यामध्ये हिंदुत्वाचा विचार करणे कसरतीचे काम आहे.     अध्यक्षीय भाषणात उल्हास पवार यांनी अतिरेकी अस्मिता जागृत होत असताना विवेकी हिंदुत्वाची मांडणी रा. ना चव्हाण करतात.सुधारक आणि विचारवंतांची तुलना करण्यापेक्षा त्यांची विवेकी चिकित्सा करायला हवी. वाद, परिसंवाद आणि संवादातून विवेचन व्हायला पाहिजे याकडे लक्ष वेधले.     यासाठी प्रतिष्ठानचे विश्वस्त सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले. ...................कॉम्रेड शरद पाटील हे विद्वान होते. पण अब्राम्हणी तत्वज्ञानाच्या विषम अशा मांडणीमध्ये त्यांची विद्वता नासली आणि कुजली. म्हणून त्यांची भूमिका क्रांतीकारी आणि सर्व समाजाला जोडू शकली नाही, असे मत डॉ. सबनीस यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसHindutvaहिंदुत्व