शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे; सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 20:32 IST

रस्त्याचे काम झाल्यास येथील दळणवळण वाढून भोर वेल्हा तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल

नसरापूर : बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळद पासून कर्णवडी मार्गे महाडला जोडणारा राज्य मार्ग क्र १०६ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. तसे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. हा राज्य मार्ग रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करून रस्त्याचे काम झाल्यास येथील दळणवळण वाढून भोर वेल्हा तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खासदार सुळे यांनी लेखी पत्र पाठवले असून लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, अशी विनंती केली आहे. महाड – रानवडी – कर्णवडी – मढेघाट – केळद – पासली – भट्टी – वेल्हे – आंबवणे – नसरापूर – चेलाडी फाटा राज्य मार्ग १०६ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ४८ – पुणे बंगळूर हायवे व राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई-गोवा हायवे या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा मार्ग असून पुण्याहून कोकणला जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असा घोषित करून त्याचे काम पूर्णत्वास जाणे अत्यावश्यक आहे, असे खा.सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले असून नसरापूर येथील महामार्ग क्र. ४८ महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल तयार आहे.

वेल्हे तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून या परिसरात इतिहासाची साक्ष देणाऱ्या बनेश्वर, अमृतेश्वर, किल्ले राजगड, तोरणा तसेच मढेघाट आदि वास्तू, किल्ले आणि देवस्थानांची येथे रेलचेल आहे. त्यामुळे गडकोटांना आणि ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देणाऱ्या गडप्रेमी आणि अभ्यासक तसेच पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. याबरोबरच वेल्हे तालुका हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने या भागातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी फारश्या उपलब्ध नाहीत. हे लक्षात घेता या भागातून जाणारा महामार्ग विकसित केल्यास या परिसरातील दळणवळण वाढेल. यामुळे वेल्हे तालुक्याशी आजूबाजूच्या परिसराचा संपर्क वाढून या परिसरातील पर्यटनासही चालना मिळेल. याबरोबरच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. तरी कृपया महाड – रानवडी – कर्णवडी – मढेघाट – केळद – पासली – भट्टी – वेल्हे – आंबवणे – नसरापूर – चेलाडी फाटा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करून राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग