शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पुण्यात मुली नेहमी वापरतात स्कार्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 16:13 IST

गाडीवरुन जात असताना पुण्यात मुली नेहमीच स्कार्फ वापरत असतात. गाडीवर स्कार्फ वापरणं ही आता एक पुण्याची संस्कृतीच झाली अाहे.

पुणे : पुण्यातील मराठी संस्कृती जशी जगभर प्रसिद्ध अाहे, तशीच पुण्यातील स्कार्फ संस्कृतीही तितकीच प्रसिद्ध अाहे. पुण्यातील कुठल्याही रस्त्यावरुन तुम्ही जात असाल तर तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडेल की पुण्यात नेहमीच मुली गाडीवर स्कार्फ बांधतात तरी का ?  याच प्रश्नाचं उत्तर अाम्ही पुण्यातील मुलींशी बाेलून शाेधण्याचा प्रयत्न केला. त्यात धुळीपासून संरक्षणासाठी हा स्कार्फ वापरला जात असला तरी पुण्यात स्कार्फ बांधला नाहीतर अपुर्ण वाटत असल्याची भावना तरुणींनी व्यक्त केली.     पुणेरी पाट्या, पुणेरी संस्कृती, पुण्याचं फूड जितकं फेमस अाहे. तितकीच पुण्याची स्टाईलही फेमस अाहे. पुण्यातील बहुतांश मुली या दुचाकीवरुन प्रवास करताना किंवा बसमधून प्रवास करत असताना स्कार्फचा वापर करतात. स्कार्फ नाही बांधला तर अनेक तरुणींना अपुर्ण वाटतं. गाडीवरु जाताना गाडीचा ब्रेक जितका महत्त्वाचा अाहे तितकंच महत्त्वाचं गाडीवरुन जाताना स्कार्फ बांधणं मुलींसाठी अहे. याबाबत गाैरी म्हणाली, सध्या पुण्यात उन्हाचा कडाका खूप असताे. गाडीवरुन जात असताना उन्हामुळे टॅन हाेऊ नये म्हणून स्कार्फ वापरला जाताे. त्याचबराेबर वाऱ्यामुळे केस खराब हाेऊ नयेत, तसेच मेकअपही खराब हाेऊ नये म्हणून स्कार्फचा वापर केला जाताे. मुग्धा म्हणते, पुण्यातील प्रदूषण वाढतंय, झाडांची संख्याही कमी हाेतीये. त्यामुळे या प्रदूषणाचा गाडीवरुन जाताना खूप त्रास हाेताे. या प्रदूषणापासून चेहऱ्याचं संरक्षण व्हावं, तसेच वाऱ्याबराेबर येणारी धुळ चेहऱ्यावर बसू नये यासाठी स्कार्फचा वापर केला जाताे. एेश्वर्याचं म्हणंण वेगळं अाहे. आपण मित्रासाेबत असताना काेणी अापल्याला अाेळखू नये यासाठी सुद्धा मुली स्कार्फ वापरतात असं तिंच म्हणंण अाहे. त्याचबराेबर सवयीमुळे सुद्धा स्कार्फ बांधत असल्याचे ती म्हणते. रुपाली म्हणते स्कार्फ बांधणं हा पुण्यातील एक परंपराच झाली अाहे. बहुतांश मुली बाहेर पडताना स्कार्फ बांधतात. त्याची कारणं वेगवेगळी असली तरी स्कार्फ हा बांधला जाताेच.     देविका म्हणाली, स्कार्फची अाता सवय झाली अाहे. उन्हापासून, धुळीपासून संरक्षण व्हावं हा जरी त्यातील एक भाग असला तरी स्कार्फ बांधणं हा अाता पुण्याच्या परंपरेचा एक भाग झाला अाहे. काही मुलींना असुरक्षितता वाटते म्हणूनही त्या स्कार्फचा वापर करतात. रात्रीच्यावेळी उशीरा गाडी चालवत असेल तर काेणी अाेळखू नये, काेणी वाईट नजरेने पाहू नये म्हणूनही स्कार्फ वापरल जाताे. मधुरा म्हणते पुणेकरांना मुलींना स्कार्फमध्ये पाहण्याची इतकी सवय झाली अाहे की एखाद वेळेस गाडीवरुन जाताना स्कार्फ बांधायचा राहिला तर मित्र सुद्धा अाठवण करुन देतात. मी अकरावीत असल्यापासून स्कार्फ बांधायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्या माेठ्या बहिणीने स्कार्फ कसा बांधायचा हे मला शिकवलं हाेतं. गाडीवर स्कार्फ बांधणं ही अाता पुण्यातील परंपराच झाली अाहे.

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरcultureसांस्कृतिक