शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज चौकात ध्वनीरोधक सहापदरी उड्डाणपूल होणार : नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 19:28 IST

१३५ कोटी रुपयांना लवकरच मान्यता

ठळक मुद्देवाहतुकीमुळे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांना त्रास होऊ नये ,यासाठी ध्वनीरोधक यंत्रणा

पुणे : कात्रज चौकामधे सहापदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, त्यासाठी १३५ कोटी रुपयांच्या निधीस लवकरच मान्यता देण्यात येईल. उड्डाण पुलावरील वाहतुकीमुळे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांना त्रास होऊ नये ,यासाठी पुलावर ध्वनीरोधक (साऊंड बॅरीयर) यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे केली. वडगाव (नवले पूल) ते कात्रज दरम्यानच्या ३.८८ किलोमीटर लांबीच्या सहापदरी रस्त्याच्या कामांचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. आंबेगाव येथील शिवसृष्टी येथे हा कार्यक्रम झाला. आमदार शिवेंद्रराजे भोसले, भीमराव तापकीर, माजी आमदार योगेश टिळेकर, श्रीनाथ भीमाले, बाबा मिसाळ, जगदीश कदम, मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमापुर्वी गडकरी यांनी शिवसृष्टीच्या कामाची माहिती घेतली. तसेच, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवसृष्टीचे स्वप्न सर्वांनी मिळून साकार करण्याचेही त्यांनी सांगितले. गडकरी म्हणाले, पुणे-सातारा रस्त्यावरील काम अडचणीचे ठरत आहे. त्यात ठेकेदार, नागरीक असा सर्वांचाच त्रास होत आहे. जवळपास नव्वद टक्के काम झाले आहे. उर्वरीत काम लवकरच मार्गी लागेल. वडगाव ते कात्रज दरम्यान उभारण्यात येणाºया सहापदरी रस्त्यांना आवश्यक पूरक रस्ते निर्माण करण्यात येतील. तसेच, शिवसृष्टीकडे येणे पर्यटकांना सोयीचे जावे यासाठी देखील विशेष प्रयत्न करण्यात येतील. या शिवाय कात्रज चौकात सहापदरी उड्डाणपूल बांधण्यात येईल. राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये याची दक्षता घेतली जाईल. त्यानुसार उड्डाण पुलावर ध्वनीरोधक बसविण्यात येईल. तत्पूर्वी झालेल्या भाषणात आमदार तापकीर यांनी सेवा रस्त्यांची रुंदी सात वरुन दहा मीटर करण्याची मागणी केली. गडकरी यांनी ही मागणी मान्य करण्याचे आश्वासन आपल्या भाषणात दिले. -------------- 

टॅग्स :katrajकात्रजkatraj zoo parkकात्रज प्राणीसंग्रहालयNitin Gadkariनितीन गडकरी