शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आगामी काळात मंत्री पदासाठी भाजपमध्ये मारामाऱ्या होतील; अमोल मिटकरींचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 18:18 IST

शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री

बारामती : शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.  मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. आगामी काळात भाजपच्या नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी मारामाऱ्या होतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. बारामती येथे रविवारी ( दि. 24) एका कार्यक्रमानिमित्त आमदार मिटकरी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, अशोक चक्राबाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत समाधानकारक आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस हे सरकार लोकशाहीची पायमल्ली करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. ते जास्त दिवस टिकणार नाही. शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री आहेत आणि हे त्रिकाल बाधित सत्य आहे. तसेच यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या बद्दल व्यक्त केलेल्या मताशी आपण सहमत आहोत. पुरंदरेंनी साहित्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची जेवढी बदनामी केली तेवढी कोणीच केली नाही, असेही यावेळी मिटकरी म्हणाले.

टॅग्स :BaramatiबारामतीAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे