शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

..इथेच अश्रू अनावर झाले होते : रोहिणी हट्टगंडी झाल्या भावनाविवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 20:23 IST

दु:ख अनावर न झाल्याने पडद्यामागे जावून याच व्यासपीठावर रडले होते...

ठळक मुद्देमंतरलेले पाणी या नाटकात पहिली भूमिका

पुणे : एकावन्न वर्षांपूर्वी या जागेवर नाट्यगृह नव्हते. फक्त मोकळी जागा होती.. आणि एका बाजूला व्यासपीठ उभारले होते. माझ्या पहिल्या नाटकाचा प्रयोग सुरू झाला. पहिले दोन अंक झाले आणि पावसाला सुरूवात झाली. प्रयोग बंद पडला. पहिलाच प्रयोग पूर्ण न झाल्याचे प्रचंड दु:ख झाले. हे दु:ख अनावर न झाल्याने पडद्यामागे जावून याच व्यासपीठावर रडले होते. मात्र आज अभिमानाने सांगते. मी जे आहे ते या नाटयगृहामुळेच म्हणूनच मी या नाटयगृहाच्या ऋणात आहे.. अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी ’भरत’च्या आठवणींना उजाळा दिला.  भरत नाट्य संशोधन मंदिर आणि संवाद पुणे यांच्या वतीने पहिल्या संगीत नाटय महोत्सवाचे उदघाटन हट्टंगडी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, कार्याध्यक्ष अभय जबडे, विश्वस्त पांडुरंग मुखडे, संवाद पुणेचे सुनील महाजन आदी उपस्थित होते.हट्टंगडी म्हणाल्या, मंतरलेले पाणी या नाटकात मी पहिली भूमिका केली. या नाटकाचा प्रयोग याच नाट्यगृहात होत होता. मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यावेळी खूप वाईट वाटले होते. मात्र आज अभिमानाने उभी आहे. मनात अनेक आठवणी दाटून आल्या आहेत. या नाट्यगृहानेच मला कलाकार म्हणून घडविले. आनंद पानसे, मिलिंद काळे, कृष्णकुमार गोयल यांनी मनोगत व्यक्त केले.रोहिणी हट्टंगडी यांचा परिचय आणि सूत्रसंचालन अभय जबडे यांनी केले. वृंदा पांगारकर हिने रोहिणी हट्टंगडी यांचे काढलेले चित्र त्यांना भेट दिले. जयदीप कडू, अनघा घारे आणि तनुश्री सोहनी यांचा सत्कार रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते करण्यात आला.-----------------------------------------------अन पहिल्या प्रयोगातील मित्र भेटलेसुमारे 51 वषार्पूर्वी टुणटुणनगरी खणखण बाजा या नाटकाचा प्रयोग या नाट्यगृहात पार पडला होता. त्या नाटकातील काही कलाकार संगीत नाट्य संमेलनानिमित्त एकत्र आले होते. त्यात नाट्यगृहाचे अध्यक्ष आनंद पानसे, रोहिणी हट्टंगडी यांचाही समावेश होता. या सर्व कलाकारांनी एकत्र येत 51 वर्षांच्या अतूट नाट्य मैत्रीचा धागा अधिक दृढ केला.  

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटक