शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'लसीचा विपरित परिणाम होणार नाही ना', या भीतीने गर्भवती महिला संभ्रमावस्थेत; पुण्यात लसीकरणाची आकडेवारी १०० च्या आतच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 13:58 IST

पुणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४३ गर्भवतींचे, औंध जिल्हा रुग्णालयात ७ तर ससून रुग्णालयात ४ गर्भवतींचे लसीकरण झाले आहे.

ठळक मुद्देकोरोनाची संसर्ग तीव्र असल्यास अर्भकावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भवतींनी लस घेण्याचा स्त्रीरोगतज्ज्ञांकडून सल्ला

पुणे : मागील आठवड्यापासून गर्भवतींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गट आणि कोरोना लसीकरणासाठी असलेल्या ‘राष्ट्रीय तज्ज्ञ गटा’च्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने गरोदर महिलांना ‘कोव्हिड-१९’ लसीकरणात समाविष्ट केले आहे. लसीकरणाबाबत गर्भवतींमध्ये अजूनही काहीसा संभ्रम पहायला मिळत आहे. पुणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४३ गर्भवतींचे, औंध जिल्हा रुग्णालयात ७ तर ससून रुग्णालयात ४ गर्भवतींचे लसीकरण झाले आहे.

इतरांच्या तुलनेत गर्भवतींना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे आजवरच्या अभ्यासातून सिध्द झाले आहे. गर्भावस्थेत रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. कोरोनाची संसर्ग तीव्र असल्यास अर्भकावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भवतींनी लस घेण्याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांकडून दिला जात आहे. मात्र, गर्भावस्था हा आयुष्यातील अत्यंत नाजूक टप्पा असल्याने लसीचा विपरित परिणाम होणार नाही ना, या भीतीने गर्भवती महिला संभ्रमावस्थेत असल्याचे दिसत आहे.

गर्भवस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये उलटी, मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे गर्भवती महिलांमध्ये दिसतात. या काळात अशक्तपणाही आलेला असतो, बरेचदा भूक लागत नाही. तब्येतीच्या तक्रारींमुळे आधीच जीव घाबरा झालेला असतो, त्यातून लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी अशा त्रासाची भर पडू नये, अशी भीती गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये दिसून येत आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोलून गर्भवतींनी आपल्या सर्व शंकांचे निरसन करुन घ्यावे आणि लसीचा थोडा त्रास झाल्यास काय करावे, याबाबतही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, मात्र लस घेण्याबाबत विनाकारण गैरसमज बाळगू नयेत, असे आवाहन केले जात आहे.गर्भवतींचे लसीकरण

पुणे मनपा : ४३औैंध जिल्हा रुग्णालय : ७ससून रुग्णालय : ४मला सध्या चौथा महिना सुरु आहे. लग्नाला पाच वर्षे झाली. दोन वर्षांपूर्वी गर्भपात झाला होता. त्यामुळे आता गर्भधारणा झाल्यापासून खूप जपावे लागते. लस घेतल्यावर मला आणि बाळाला काही त्रास होणार नाही ना, अशी भीती वाटते. माझ्या डॉक्टरांनी लस घेणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. मात्र, मी स्वत: आणि कुटुंबातील सदस्यही अद्याप माझ्या लसीकरणाबाबत निश्चित निर्णय घेऊ शकलेलो नाही. असे गर्भवती महिला अनिता बिनिवाले यांनी सांगितले. 

गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत लस घेता येणार :- डॉ. नीलम दिक्षित, प्रसुती विभागप्रमुख, औंध जिल्हा रुग्णालय

गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत लस घेता येऊ शकते. कोरोनाची लागण झाल्यास निर्माण होणा-या धोक्यांबाबत महिलांचे समुपदेशन केले जाते. लसीकरणाआधी हाय रिस्क फॅक्टर किंवा सहव्याधी आदींची माहिती घेतली जाते. गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली असेल तर कोरोनामुक्त झाल्यावर तीन महिन्यांनी किंवा प्रसुतीनंतर लसीकरण होऊ शकते. लसीकरणानंतर सौम्य ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्यास योग्य औषधोपचार डॉक्टरांकडून सुचवले जातात.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल