शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील विनोदाबाबत गांभीर्यच नाही, महिलाच अनभिज्ञ : तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 06:41 IST

विनोद १ : ‘मी जेवायला बसणार होतो, तेवढ्यात बायको मला म्हणाली, ‘मी पण बसू का तुमच्या ताटात?’ मी गमतीनं म्हणालो, ‘मावशील का?’ अन् उपास घडला ना राव!’

प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : विनोद १ : ‘मी जेवायला बसणार होतो, तेवढ्यात बायको मला म्हणाली, ‘मी पण बसू का तुमच्या ताटात?’ मी गमतीनं म्हणालो, ‘मावशील का?’ अन् उपास घडला ना राव!’विनोद २ : नवरा जेवताना बायकोला म्हणाला, ‘आज पोळ्या करपल्यात,’ तिने वळून त्याकडे रागाने बघितलं .... !!तो लगेच बोलला, फार छान लागतायत , ‘कुरुम कुरुम’विनोद ३ : लहानपणीची अफवा... बेडकाला दगड मारला की मुकी बायको मिळणार. जाम घाबरायचो तेव्हा... ‘आता वाटतंय, दगड मारला असता तर बरे झाले असते!’विनोद ४ : नवरा आपल्या बायकोला घेऊन हॉटेलमध्ये जातो. नवरा : काय खाणार तू...?बायको : काही पण चालेल... नवरा : वेटर, अरे एक मेनूकार्ड आण रे...बायको : अहो दोन मागवा ना, मी पण तेच खाणार...!व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक अशा माध्यमातून दररोज महिलांवर विनोदांचा भडिमार होत असतो. प्रत्यक्षात विनोदाच्या माध्यमातून स्त्रियांवरील टीकाटिप्पणी, शेरेबाजी, ताशेरे, त्यांच्या हुशारीवर घेतलेला संशय आदी बाबी गांभीर्याने घेणे आवश्यक असताना याकडे विनोदाच्या अंगानेच पाहिले जाते. नवºयाला टोमणा मारणे ही क्रूरता असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला असताना महिलांवर होणारे विनोद हीसुद्धा अपमानास्पद बाब असल्याची भावना महिलांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, याविरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याची वस्तूस्थितीही समोर आली आहे.बुधवारी ‘नवºयाला टोमणे मारणे ही क्रूरता- उच्च न्यायालयाचा निर्णय’ ही बातमी वाहिन्यांवर झळकली आणि सोशल मीडियावरून वाºयासारखी पसरली. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर या निर्णयाबाबत बºयाच चर्चाही रंगल्या. उशिरा का होईना, पण न्यायालयाला पुरुषांच्या त्रासाची, हक्काची जाणीव झाली, अशा पद्धतीने प्रतिक्रिया उमटल्या. दुसरीकडे, महिलांवर विविध प्रकारचे विनोद सोशल मीडियामध्ये फिरत असतात. त्यामध्ये महिला पुरुषांवर गाजवत असलेले प्रभुत्व, व्यावहारिक ज्ञानाचा अभाव, त्यांनी घरात निर्माण केलेली दहशत, शारीरिक व्यंग अशा विविध विषयांवर टोमणे आणि टिकाटिप्पणी केलेली असते. कोणताही विचार न करता, केवळ हसण्यावारी नेऊन अनेकांकडून हे मेसेज फॉरवर्ड केले जातात. फॉरवर्ड करणाºयांमध्ये अनेकदा महिलांचाही समावेश असतो. अशा मेसेजमधून स्त्रियांचे चारित्र्यहनन होत असल्याची केवळ कुजबुज केली जाते. मात्र, याबाबत आक्षेप घेण्यासाठी किंवा तक्रार दाखल करण्यासाठी महिला कधीच पुढाकार घेत नाहीत, अशी वस्तूस्थिती महिला वकिलांनी मांडली.‘महिलांवर होणारे विनोद ही त्यांच्या सन्मानाला लागलेली ठेचच असते. भारतीय राज्यघटनेने महिलांना समान हक्क बहाल केले आहेत. मात्र, विनोद, शेरेबाजी, सोशल मीडियावरील पोस्ट यातून महिलांची नाहक बदनामी करून समानतेच्या मूल्यांनाच धक्का लागतो. महिलांचा अपमान करणारे वाक्प्रचार सर्रास वापरले जातात. या अयोग्य वागणुकीबाबत महिलांनी आक्षेप नोंदवल्यास हे प्रमाण नियंत्रणात येऊ शकते. मात्र, अशा प्रकरणात आजवर कोणीही तक्रार दाखल केल्याचे ऐकिवात नाही,’ असे मत भारतीय महिला फेडरेशनच्या लता भिसे यांनी ‘‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.पुुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे महिलांवर कायम विनोद केले जातात, त्यांना कायम गृहित धरले जाते. अनेक महिलाच महिलांवरील मेसेज फॉरवर्ड करीत असतात. हा आपलाच अपमान असल्याचे त्यांच्या लक्षातच येत नाही. प्रत्यक्षात विनोद, पोस्ट हा एक प्रकारचा अत्याचारच आहे. याबाबत महिलांनी पुढाकार घेऊन आक्षेप नोंदवायला हवा. केवळ स्त्रियांनीच नव्हे, तर पुरुषांनीही यातील गांभीर्य ओळखले पाहिजे. काय चांगले आणि काय वाईट, हे समजण्यासाठी मुलांवर लहानपणापासून घरातूनच संस्कार करणे गरजेचे आहे.- शैलजा मोळक,सामाजिक कार्यकर्त्यासोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे फॉरवर्डचे प्रमाणही वाढले आहे. विनोद कुठे संपतो आणि विडंबन कुठे सुरू होते, यातील सीमारेषाच आपल्याला कळत नाही. स्त्रीला पुरातन काळापासून करमणुकीची, उपभोगाची वस्तू म्हणूनच पाहिले जाते. विनोदातील उपरोधिकता महिलांच्याच लक्षात येत नाही. याकडे गांभीर्याने पाहून स्त्रियांनी आत्मसन्मान जपल्यास समाज त्यांना मान देईल. सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुराबाबत सायबर सेलकडे तक्रार नोंदवता येऊ शकते. तसेच महिला आयोगाच्या माध्यमातूनही याबाबत पुढाकार घ्यायला हवा.- अ‍ॅड. मोनिका निकमएखादा विनोद अथवा सोशल मीडियावरील पोस्ट बदनामीकारक वाटल्यास महिला त्याविरोधात तक्रार दाखल करू शकतात. मात्र, अशा पोस्ट स्त्रियाच गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. एरवी कायद्याच्या कोणत्याही प्रकरणात स्वयंसेवी संस्था पुढे येतात. अशा बाबतीतही स्वयंसेवी संस्थांनी, महिला आयोगाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. महिलांवरील विनोदाचे प्रकार सातत्याने घडत आले आहेत. याबाबत स्त्रियांनी गांभीर्याने विचार करून, तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आले पाहिजे. कायद्यामध्ये या प्रकारची तरतूदही उपलब्ध आहे.- अ‍ॅड. सुप्रिया कोठारी

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला