शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्यांना ४ महिने पगार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 06:56 IST

महापालिकेच्या वतीने शहरामध्ये दैनंदिन झाडनकाम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते.

पुणे : शहरामध्ये झाडन काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांचे गेले चार महिने पगार झाले नाही. यामुळे शहराच्या बहुतेक भागात या कर्मचाºयांनी दैनंदिन झाडन काम थांबविले आहे. यामुळे सध्या अनेक भागामध्ये कचºयाचे साम्राज्य झाले आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाय-योजना केल्या नाही तर शहराची कचराकोंडी होईल, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.महापालिकेच्या वतीने शहरामध्ये दैनंदिन झाडनकाम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. या कर्मचाºयांची नियुक्ती करण्यासाठी दर वर्षी प्रशासनाकडून टेंडर काढले जाते. त्यानंतर ठेकेदारामार्फत हे कर्मचारी नियुक्ती केले जाते; परंतु सफाई कर्मचाºयांच्या टेंडरची मुदत संपली असून, गेल्या चार महिन्यांपासून या कर्मचाºयांना पगारच मिळालेला नाही. यामध्ये पुन्हा टेंडर मिळेल, या अपेक्षेन अनेक ठिकाणी संबंधित ठेकेदारांकडून काम सुरू ठेवले आहे; परंतु आता चार-चार महिनेपगार मिळत नसल्याने सफाई कर्मचाºयांनी काम थांबविले असल्याचे तुपे यांनी सांगितले. शहरामध्ये कोथरूडसह सर्वच भागात ही परिस्थिती असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. यावर सफाई कर्मचाºयांची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वतंत्रपणे टेंडर काढण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच नव्याने कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येईल. तोपर्यंत काही ठिकाणी अडचण असले तर महापालिकेच्या वतीने सफाईची सोय करण्यात येईल, असे प्रभारी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी स्पष्ट केले.डीबीटीबाबत स्थायी समितीच्या निर्णयानंतरच चर्चाविद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटपासाठी राबविण्यात येत असलेल्या डीबीटी योजनेबाबत सध्या सुरू असलेल्या गोंधळाबाबत नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. शाळा सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना अद्याप डीबीटीचा घोळ मिटला नसल्याचे सांगत, सदस्यांनी यंदा तरी विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळणार का, प्रश्न उपस्थित केला. यावर महापौर मुक्ता टिळक यांनी डीबीटीबाबत अद्याप स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय झाला नसून, स्थायी समितीच्या निर्णयानंतर मुख्यसभेत या विषयावर चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न