शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पगड्या बदलणाऱ्यांना उत्तर द्यायचे कारण नाही - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:48 IST

शरद पवार यांच्यासारखे अभ्यासू नेते निवडणुका जवळ आल्या की बहुजन समाजाच्या मतांचे गणित डोळ्यांसमोर ठेवून काहीही वक्तव्ये करतात.

पुणे : शरद पवार यांच्यासारखे अभ्यासू नेते निवडणुका जवळ आल्या की बहुजन समाजाच्या मतांचे गणित डोळ्यांसमोर ठेवून काहीही वक्तव्ये करतात. मतांवर डोळा ठेवून पगड्या बदलणा-यांच्या पत्राला मी उत्तर देण्याचे कारण नाही, अशा शब्दांत राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निशाणा साधला. शुल्क नियंत्रण कायदा अंतिम टप्प्यात असून, येत्या अधिवेशनात त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, असे सूतोवाचही त्यांनी केले.राज्य सरकारने शाळा बंदचा घेतलेला निर्णय हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. महाराष्ट्राच्या शिक्षण परंपरेशी हा निर्णय पूर्णपणे विसंगत आहे, असे सांगत राज्य सरकारशी पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी सांगितले होते. याबाबत विचारणा केली असता, तावडे यांनी पवार यांच्या वक्तव्याचा पत्रकारांशी बोलताना समाचार घेतला. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर आमचा भर आहे, असेही त्यांनी सांगितले.आॅनलाइन शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत किती जागा उपलब्ध आहेत, हे नुकतेच ग्राम विकास खात्याने कळविले आहे. त्या जागांसाठी लवकरच वित्त विभागाकडून मान्यता घेण्यात येईल. पवित्र पोर्टलवरील पुढील टप्पा १५ दिवसांत सुरू होईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.‘सिंबायोसिस’चा पदवीप्रदान सोहळाडिग्री, नोकरी, छोकरीची मानसिकता आता बदलायला हवी. विद्यार्थ्यांनी पठडीतल्या शिक्षणपद्धतीवर अवलंबून न राहता शिक्षणाबरोबरच कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन विनोद तावडे यांनी सिंबायोसिस कला व वाणिज्य माहविद्यालयाच्या तिसºया पदवी प्रदान सोहळ्यात केले. महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डाची स्थापना केली असून, त्याअंतर्गत पुढील वर्षात १०० शाळा सुरु करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बाद झाली, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. साहित्य संमेलन यापुढे कोणत्याही वादाशिवाय पार पडेल आणि रसिकांना साहित्याचा निखळ आनंद घेता येईल.- विनोद तावडे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे