शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आंबेडकर जयंतीसाठी तरतूद नाही, न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 04:09 IST

‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उधळपट्टी नको’ या न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने जारी केलेल्या परिपत्रकाचा फटका शिवजयंतीप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही बसला आहे.

पुणे - ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उधळपट्टी नको’ या न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने जारी केलेल्या परिपत्रकाचा फटका शिवजयंतीप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही बसला आहे. यानिमित्त कार्यक्रम करण्यासाठी म्हणून महापालिकेच्या अंदाजपत्रकात कसलीही तरतूद करण्यात आलेली नाही, मात्र तरीही जयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्धार यानिमित्त महापालिका सभागृहात बुधवारी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. जयंतीदिनाच्या नियोजनासाठी म्हणून महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सभागृहात शहरातील विविध संघटना, संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयच्या (आठवले) गटनेत्या सुनीता वाडेकर, एमआयएमच्या गटनेत्या अश्विनी लांडगे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग, डॉ. प्रवीण मुंडे, नगरसेवक अजय खेडेकर, आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महापौरांनी यावेळी महापालिकेने जयंतीदिनासाठी केलेल्या विविध सुविधांची माहिती दिली. पुतळ्याच्या परिसरात फ्लेक्स लावले जातात, त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. पीएमपीच्या फेºया वाढवण्यास सांगण्यात येणार आहे, असे महापौरांनी सांगितले. अशा प्रकारच्या बैठका आयोजित करून अंमलबजावणी करण्याची मागणी मिलिंद अहिरे यांनी केली. अ‍ॅड. वैशाली चांदणे, हनुमंत गायकवाड, योगेश पिंगळे, उमेश चव्हाण, श्याम गायकवाड, नीलेश गायकवाड यांच्यासह आंबेडकरी चळवळीत काम करणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही यावेळी अनेक सूचना केल्या.कायद्याचे उल्लंघन नकोकोरेगाव भीमा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विविध दलित संघटना आक्रमक आहेत. त्यामुळे पोलीस अधिकाºयांनी चिंता व्यक्त करीत कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. तसे काही आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. नागरिकांनीच याबाबत सतर्क रहावे व कुठेही काहीही अनुचित प्रकार, घटना, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना त्याची माहिती कळवावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांनी केले.उपमहापौर डॉ. धेंडे यांनी न्यायालयाचा आदेश व सरकारी परिपत्रक यामुळे जयंतीसाठी अंदाजपत्रकात तरतूद नसली तरीही महापालिकेच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. संस्था, संघटना यांनी महापालिकेची मदत हवी असेल तर त्याबाबत त्वरित सांगावे, रस्ते किंवा परिसर स्वच्छता याबाबत संबंधित विभागांना आदेश देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीnewsबातम्या