शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
3
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
4
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
5
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
6
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
7
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
8
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
9
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
10
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
11
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
12
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
13
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
14
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
15
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
16
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
17
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
18
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
19
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
20
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस

राजकीय हस्तक्षेप नकोच

By admin | Updated: May 16, 2015 04:17 IST

महापालिकेच्या वतीने चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संत तुकाराम महाराज संतपीठाविषयी चर्चा करण्यासाठी महापालिकेतील स्थायी समिती

पिंपरी : महापालिकेच्या वतीने चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संत तुकाराम महाराज संतपीठाविषयी चर्चा करण्यासाठी महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. मूल्याधिष्ठित संस्कार देणारे संतपीठ उभारताना राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यास उपस्थितांनीही अनुमोदन दिले. या बैठकीत धोरणांवर चर्चा झाली.बैठकीस महापौर शकुंतला धराडे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्ञानप्रबोधिनीचे प्रमुख वा. ना. अभ्यंकर, ह. भ. प. मारुतीमहाराज कुऱ्हेकर, ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर, आयुक्त राजीव जाधव, आमदार महेश लांडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, पक्षनेत्या मंगला कदम, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक दत्तात्रय साने, नगरसेविका स्वाती साने, यशवंत लिमये, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर, कायदा सल्लागार अ‍ॅड. सतीश पवार, उपमुख्य लेखापाल संजय गवळी, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.महापालिका सर्वसाधारण सभेत एक वेळा तहकूब ठेवलेला संतपीठाचा विषय बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐन वेळेसचा विषय म्हणून मंजूर करण्यात आला. महासभेने या विषयास मंजुरी दिल्यानंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी आज बैठकीचे आयोजन केले होते. महापालिकेच्या वतीने अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे, यावर विश्वासच बसत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कीर्तनकारांनी सुरुवातीला दिली व उपक्रमाबद्दल महापालिकेचे कौतुक केले. (प्रतिनिधी)