शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! पुणे जिल्ह्यातील तब्बल पावणे चार लाख मतदारांचा मतदार यादीत फोटोच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 20:59 IST

मतदारांचे छायाचित्र गोळा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची  विशेष मोहीम

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन शंभर टक्के छायाचित्रयुक्त मतदार यादी तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  परंतु पुणे जिल्ह्यात अद्यापही तब्बल 3 लाख 79 हजार 933 मतदारांचे यादीत छायाचित्र नाही. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा छायाचित्र नसलेल्या मतदारांची छायाचित्र गोळा करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावतीकरण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. आयोगाने शंभर टक्के छायाचित्र युक्त मतदार यादी तयार करण्याचा निर्णय घेतला असून,  यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे.  पुणे जिल्ह्यात 78 लाख 87 हजार 874 एकूण मतदार आहेत.  यापैकी 3 लाख 79 हजार 933 मतदारांची यादी छायाचित्र नाही. आयोगाच्या या छायाचित्र शोध मोहिमेनंतर देखील ज्या मतदारांचे छायाचित्र मिळणार नाही , अशी नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत. 

जिल्ह्यातील 21 विधान सभा मतदार संघात मतदार यादी शुध्दीकरण मोहिम भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनांनुसार राबविण्यात येत आहे. त्यानुसार मतदार यादीमध्ये नवीन मतदारांची नोंदणी करणे, मयत, स्थलांतरीत दुबार मतदारांची वगळणी करणे, मतदार यादीमध्ये नाव आहे. परंतु फोटो नाही अशा मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे, Logical Error ची दुरुस्ती करणे इत्यादी कामकाज सुरु आहे. यामुळे अशा मतदारांनी ८ दिवसांमध्ये आपली छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे अथवा मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे जमा करावे. 

जे मतदार पुढील ८ दिवसांत छायाचित्र जमा करणार नाहीत अशा मतदारांची नावे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन त्यांची नावे मतदार यादीतून वगळणेत येतील याबाबत संबंधीत मतदारांनी नोंद घ्यावी. तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी (Residual Voters) मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयामध्ये पडताळणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे वेबसाईट pune.nic.in / pune.gov.in या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीचे अवलोकन करुन आपले नाव यादीमध्ये असल्यास येत्या ८ दिवसांमध्ये आपले छायाचित्र संबंधित ठिकाणी जमा करावे. सदर कार्यक्रम कालमर्यादित आहे. -----यादीत छायाचित्र नसलेले मतदारांची तालुकानिहाय संख्या जुन्नर- 28, आंबेगाव- 153, खेड-आंळदी - 503,  शिरूर- 11202, दौड - 11583, इंदापूर- 7119, बारामती - 0, पुरंदर- 6183, भोर - 1583, मावळ - 2271, चिंचवड- 7476, पिंपरी- 13527, भोसरी - 3246, वडगाव शेरी - 70711, शिवाजीनगर- 30474, कोथरूड- 46889, खडकवासला - 47789, पर्वती- 23580, हडपसर- 50222, पुणे कॅन्टोन्मेंट- 29785, कसबा पेठ- 15909एकूण- 379933

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड