शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
3
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
4
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
5
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
6
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
7
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
8
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
9
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
10
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
11
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
12
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
13
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
14
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
15
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
16
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
17
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
18
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
19
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
20
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन

शाळा पाडण्यामागे कुठलाही हेतू नाही - प्रकाश धारिवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:36 IST

नगर परिषदेच्या उर्दू शाळेची इमारत पाडण्याचा नगर परिषदेचा कुठलाही हेतू नसून, त्याबाबत विनाकारण गैरसमज पसरवला जात असल्याचे नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिरूर : नगर परिषदेच्या उर्दू शाळेची इमारत पाडण्याचा नगर परिषदेचा कुठलाही हेतू नसून, त्याबाबत विनाकारण गैरसमज पसरवला जात असल्याचे नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत आमची भूमिका स्पष्ट असून, मुस्लिम समाजाच्या पदाधिकाºयांनाही अवगत केले असल्याचे त्यांनी सांगितले.नगर परिषद विरोधी पक्ष नेते मंगेश खांडरे यांनी उर्दू शाळा पाडून त्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचा नगर परिषदेचा डाव असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर, धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत नगर परिषदेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की नगर परिषदेच्या सर्व शाळांना खेळण्यास मैदान आहे. प्रशस्त इमारत व जागा आहे; मात्र उर्दू शाळेची इमारत ही छोटी असून, तिथे मैदानही नाही. इतर सर्व शाळांत ई-लर्निंग आहे; मात्र जागेअभावी उर्दू शाळेत ही सुविधा देता आली नाही. या शाळेला सर्व सुविधा मिळाव्यात, विद्यार्थ्यांना खुल्या वातावरणात शिक्षण घेता यावे, ही नगर परिषदेची पहिल्यापासून भूमिका आहे. २०१४मध्ये ही शाळा नगर परिषदेच्या लाटेआळी येथील बंद इमारतीत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव नगर परिषदेसमोर आला होता. त्यासाठी नगर परिषदेने ४० ते ५० लाख रुपयांचे इस्टिमेटही तयार केले होते. मात्र, मुस्लिम समाजाने विरोध केल्याने तो विषय त्वरित थांबवला. धारिवाल म्हणाले, उर्दू शाळेची दुरुस्ती अथवा नवीन इमारत बांधण्याविषयी निर्णय हा मुस्लिम समाजाच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊनच घेण्यात येईल. यामुळे उर्दू शाळेची इमारत पाडून तिथे व्यापारी संकुल बांधण्याबाबत होत असलेला आरोप तथ्यहीन असून विनाकारण याबाबत गैरसमज पसरवला जात आहे. नगर परिषदेने नेहमीच सर्वधर्मसमभावाचे राजकारण केले असून, मुस्लिम समाजाच्या विविध समस्यांचे सातत्याने निराकारण केले आहे. शहरातील नगरपरिषदेच्या सर्व शाळांमध्ये उर्दू शाळेचे काम चांगले असून त्यांचे कौतुक केल्याचे धारिवाल यांनी सांगितले. उर्दू शाळेचे स्वच्छतागृह, शेड तसेच विंधन विहिरींचे काम नगरपरिषदेने केले असून, मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये विकासकामे सुरू असल्याचे स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी सांगितले. मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इकबालभाई सौदागर, उपाध्यक्ष नसीम खान,सचिव सिकंदर मणियार यांच्या बांधकाम समिती सभापती उज्वला बरमेचा माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, विकास आघाडीचे नेतेसंतोष भंडारी सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.गणसंख्येअभावी सभा तहकूबनगराध्यक्षा वैशाली वाखारे म्हणाल्या, की उर्दू शाळा विकसित करण्याचा विषय सर्वसाधारण सभेसमोर होता; मात्र गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्याने हा विषय पुढे ढकलला गेला. मात्र, ज्या वेळी हा विषय येईल त्या वेळी धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या दृष्टीने योग्य असाच सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा