शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राख्यांना अपेक्षित मागणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 03:00 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने बाजारपेठेवर काहीसे मंदीचे सावट आहे

मंचर : शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने बाजारपेठेवर काहीसे मंदीचे सावट आहे. याचा परिणाम सणांवर जाणवत असून रक्षाबंधन सणासाठी राख्यांचे स्टॉल सजले असूनही राख्यांना अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे या वर्षी उलाढाल मंदावणार आहे. ग्राहकांची कमी दराच्या राख्यांना मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.महिलांसाठी महत्त्वाचा असणारा रक्षाबंधन सण रविवारी साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंचर शहरात राख्यांचे स्टॉल सजले आहेत. लहान बालकांपासून ते तरुणवर्ग, वृद्धांसाठी अनेक प्रकारच्या राख्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. बालचमूंसाठी डॉल, लाईट म्युझिक, कार्टूनचे विविध प्रकार शिन्चॅन, मोटू पतलू, छोटा भीम, बेन्टेन अशा अनेक प्रकारच्या राख्या विक्रीसाठी ठेवल्या असून लहान मुलांचे ते आकर्षण आहे. तरुणवर्गासाठी डायमंड, ब्रेसलेट, क्रिस्टल खडे, रुद्राक्ष याशिवाय वृद्धांसाठी स्पंज, रेशीमदोरी, गोंडा इ. प्रकारच्या राख्या उपलब्ध असल्याची माहिती विक्रेते सोमनाथ फल्ले यांनी दिली.दरम्यान, शेतकºयांच्या शेतमालाला बाजारभाव नाही, शेतकºयांचे चलन फिरत नसल्याने काहीसे मंदीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम राख्यांच्या विक्रीवर होतो. राख्यांना अपेक्षित मागणी नसून कमी किमतीच्या राख्या घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.आंबेगाव तालुक्यात रक्षाबंधन सणाच्या वेळेस राख्यांच्या विक्रीतून सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल होते. या वर्षी ही उलाढाल ४० लाख रुपये होण्याची शक्यता आहे. मंचर शहरात जागोजागी उभारण्यात आलेल्या राख्यांच्या स्टॉलमध्ये होलसेल खरेदी केली जात आहे. किरकोळ विक्री सुरु झाली असून रविवारी राख्यांची विक्री सर्वाधिक होईल.

टॅग्स :RakhiराखीRaksha Bandhanरक्षाबंधन