शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गाढलेल्या मुडद्यांवर राजकारण करायचंच नाही, सावरकर वादावर करुणा मुंडेंची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 17:31 IST

करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली.

मुंबई - काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं राहुल गांधींच्या विधानाचं कुठलंही समर्थन केलं नसून ते विधान चुकीचंच आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यानंतर, संजय राऊत यांनीही राहुल गांधींचं ते विधान महाविकास आघाडीला धोका पोहोचवणारं असल्याचं म्हटलं आहे. तर, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही ते विधान रुचलं नसल्याचं ते म्हणाले. यावरुन राज्यात चांगलाच वाद सुरू असून आता माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडे यांनीही या वादावर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. 

करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. राहुल गांधींकडे कुठलाही अजेंडा नसल्याचे म्हटले. त्यासोबतच, आपण सध्या राज्यात सुरू असलेल्या सावरकर वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यावरुन, भाजपसह शिंदे गट आणि मनसेही आक्रमक झाली आहे. यासंदर्भात बोलताना करुणा मुंडेंनी म्हटले की, मला त्याबाबत काहीही विधान करायचं नाही. कारण, देशात, राज्यात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, नोकरी, महागडे शिक्षण, महिलांवरील अन्याय-अत्याचार यासह विविध प्रश्न आहेत. त्यामुळे, गाढलेल्या मुदड्यांवर मला राजकारण करायचं नाही, असे स्पष्टपणे करुणा मुंडेंनी म्हटले. या वादावर मला काहीही विधान करायचं नाही, असेही त्यांनी म्हटले.  

करुणा मुंडेंनी पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी, आपणही पदयात्रा सुरू करणार आहोत. राज्यातील नेतृत्व गुण असलेल्या वंचित युवकांना आपल्यासोबत घेऊन आपण राजकीय प्रवासाची सुरुवात करणार असल्यचं त्यांनी म्हटलं. यावेळी, जर शिंदे गटाने आपल्या विचारधारेशी जुळवणी केली, तर आपण त्यांच्यासोबतही जाऊ, असे त्यांनी सांगितले. 

गृहमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा

काँग्रेस खासदार राहुल गांधी जे काही करतायेत. त्याबाबत कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी केले तर ठीक. पण कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काय करत असतील तर त्याच्यावर आम्हाला कारवाई  करावी लागेल. आम्ही भारत जोडो यात्रेला सुरक्षा पुरवली आहे. त्यांची यात्रा सुरक्षित राज्याबाहेर पाठवू. परंतु महाराष्ट्रातील वातावरण त्यांना बिघडवू नये असा सूचक इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गुजरातच्या भावनगर येथे फडणवीस निवडणूक प्रचाराला गेले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर