शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

खडकवासल्याच्या पाण्यावरून संघर्ष पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 2:22 AM

इंदापूर, बारामती, दौंड, हवेली तालुक्यांतील ६५ हजार हेक्टर शेती संकटात

- सतीश सांगळे कळस : खडकवासला धरणसाखळीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड व हवेली या तालुक्यांमधील सुमारे ६५ हजार हेक्टर शेती जळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे भविष्यात पुणे शहर व ग्रामीण हा वाद विकोपाला जाणार आहे. या निर्णयामुळे पाण्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. इंदापूर, बारामती, दौंड व हवेली या तालुक्यांमधील सुमारे ६५ हजार हेक्टर शेती सिंचनासाठी या कालव्यावर अवलंबून आहे. शहराच्या वाढत्या पाणीमागणीमुळे या भागातील फळबागा व शेती अडचणीत आल्या असून, दर वर्षी उन्हाळ्यात आवर्तन देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप या तालुक्यातील नागरिकांनी केला आहे. महत्त्वाच्या या पाणीप्रश्नी कायम सापत्नभावाची वागणूक ग्रामीण भागाला मिळत असल्याने येत्या काळात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटणार आहे.वाढत्या आवर्तनामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. यामुळे यावर्षी ही उन्हाळ्यात पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी पाणी कमी असल्याचे कारण पुढे करून उन्हाळ्यात आवर्तन सोडण्यात येणार, असा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा रासप यांच्याकडून या संवेदनशील पाणीप्रश्नावर एकत्रित मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे. जानाई व शिरसाई उपसा सिंचन प्रकल्प, तसेच दौंड व इंदापूर शहराचा पाणीपुरवठा व शेकडो ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना धोक्यात येणार आहेत. भीमा पाटस, कर्मयोगी इंदापूर, अनुराज यवत, दौंड शुगर, बारामती अँग्रो, छत्रपती भवानीनगर, या साखर कारखाना पट्ट्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. तसेच कारखान्यांनाही याची झळ सोसावी लागणार आहे.इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्यावरील ३६ गावांमधील सुमारे २० हजार हेक्टर वरील शेती व्यवस्था बारमाही सिंचनाअभावी संकटात आहे. या भागातील द्राक्षे, डाळींब, ऊस फूलशेती नेहमीच अडचणीत असते. तसेच, पिण्याच्या पाण्याचीही अवस्था गंभीर आहे. सिंचनासाठी या ठिकाणी कालव्याच्या कामाला १९६७ मध्ये सुरुवात करण्यात आली. १९८९ मध्ये हे काम पूर्ण होऊन शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत सुमारे ३६ गावांमधील २० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, १९९१ मध्ये प्रत्यक्षात या भागात पाणी आले असले, तरी आजही आठमाही जास्त शेती ही सिंचित होत नाही. कालव्यावर अवलंबून असलेली द्राक्षे, डाळींब, ऊस, फूलशेती ही पिके धोक्यात येतात.धरणसाखळीत कमी पाणी व पुणे शहराचा धरणावर अवलंबून असलेला पाणीपुरवठा यामुळे गेली काही वर्षांपासून येथील शेतीला उन्हाळी आवर्तन दिलेच जात नाही. त्यामुळे शेती संकटात आली आहे. खडकवासला धरण साखळीमधील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या धरणांची पाणीक्षमता सुमारे २९ टीमसी आहे. मात्र, पुणे शहराची पिण्याच्या पाण्याची मागणी ही वाढत असल्यामुळे उन्हाळी आवर्तनच दिले जात नाही. यामुळे या गावांमधील सुमारे ४२ पाझर तलाव हे पाण्याअभावी कोरडेच राहतात. पिण्याच्या पाण्याचे संकटही आहे. त्यामुळे येथील शेती व्यवस्था नेहमीच संकटात आहे.तालुक्यातील २० हजार हेक्टर क्षेत्राला खडकवासला कालव्याच्या पाण्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या लाभ होतो. कालवा व त्यावरील वितरिकांच्या माध्यमातून शेतकºयांना शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, सध्या कालव्याला आवर्तन दिले आहे. पण, तलाव भरून देणे गरजेचे आहे, खडकवासला कालव्याचा पट्टा हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखला जातो. या पट्ट्यात तालुक्याच्या इतर भागाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. यामुळे या भागाला खडकवासला कालव्याचा मोठा आधार आहे. मात्र, कालव्याला पाणी कधीच वेळेवर येत नसल्याने या भागातील शेतकरी संतप्त आहेखडकवासला धरण शेतीसाठी बांधण्यात आले आहे. यांच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेती सिंचित झाली आहे. मात्र, पुणे शहराला नेहमीच वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी उन्हाळी आवर्तन कमी केले जात आहे. यापुढे असले प्रकार चालू देणार नाही. खडकवासला धरणामधील पाण्यावर आमचा हक्क आहे. कोणत्याही परिस्थितीत उन्हाळी आवर्तन घेतले जाईल, वेळप्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल.- दत्तात्रय भरणे, आमदार

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई