शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात बस आहेत पण स्टॉप नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 20:29 IST

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका मिळवून चालवत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात (पीएमपीएमएल) मध्ये दररोज १३०० च्या पुढे बस धावत असताना बसस्टॉपची मात्र दुरावस्था झाली आहे.  

ठळक मुद्देपीएमपीला अनेक ठिकाणी स्टॉपचं  नाहीत, प्रवाश्यांची गैरसोय ऊन, पावसात उभे राहतात प्रवासी,  अनेक बसस्टॉपला छत नाही 

पुणे :एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना शहारातील सार्वजनिक वाहतुकीचीही अवस्था फारशी  दिसत नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका मिळवून चालवत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात (पीएमपीएमएल) मध्ये दररोज १३०० च्या पुढे बस धावत असताना बसस्टॉपची मात्र दुरावस्था झाली आहे. 

 

     शहरात व्यक्तींपेक्षा अधिक संख्येने गाड्या रस्त्यावर धावत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी अरुंद होत चाललेले रस्ते आणि त्यातच वाढत्या वाहनांमुळे दररोज वाहतूक कोंडीचाही अनुभव येत असतो. या कारणांमुळे नागरिक सार्वजनिक वाहतुकीकडे वळण्याची शक्यता असताना मात्र असुविधांमुळे असा परिणाम होताना दिसत नाही. सध्या पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या आणि भाडे तत्वावर मिळून मोठ्या संख्येने बस रोज धावत असताना  लोकांना उत्तम प्रतीचे बसस्टॉप पुरवण्यास पीएमपी अयशस्वी झाली आहे. 

 

    अनेक ठिकाणी बसस्टॉपला छत नसून ऊन, पावसात त्यांचा काहीही उपयोग होत नाही. अनेक लोकप्रतिनिधी गरज नसणाऱ्या ठिकाणी लाखो रुपये खर्चून बसस्टॉप उभारतात.प्रभात रस्त्यावर पीएमपी बस कधीही येत नसताना तिथेही बस स्टॉप बघायला मिळत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी बस थांबा अतिशय लहान असून पुरेशा संख्येने प्रवासी त्यात उभेही राहू शकत नाही. त्याचा परिणाम अनेकजण रस्त्यात उभे राहत असल्याने वाहतुकीसाठी लहान रस्ता तयार होतो आणि अंतिमतः वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. काही बसस्टॉपवर अंधार असून जवळपास उजेडाचा खांब नसल्यामुळे महिलांना सुरक्षिततेची हमी वाटत नाही. त्यामुळे बहुतांश महिला पुढे येऊन थांबणे पसंत करतात. 

 

याबाबत नागरिकांशी संवाद साधला असता नियमित प्रवास करणाऱ्या अश्विनी वैद्य यांनी कर्वेनगरच्या नव्या उड्डाणपुलाखाली बसस्टॉप नसल्याने रस्त्यावर उभे रहावे लागत असल्याची व्यथा सांगितली.अनेकदा समोरच्या दिशेने येणारी वेगवान वाहने अंगावर येतात की काय अशी भीतीही वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. वारजे जकात नाका थांब्यावर प्रवासी  पुढे जाऊन उभे राहतात तर बस स्टॉप कितीतरी पुढे आहे. याबाबत प्रवाश्यांना विचारले असता त्यांनी बस मागे थांबत असल्यामुळे स्टॉपवर उभं राहून काहीही उपयोग होत नसल्याचे सांगितले. 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीPMPMLपीएमपीएमएल