शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
5
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
6
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
9
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
10
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
11
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
12
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
13
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
14
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
15
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
16
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
17
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
18
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
19
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
20
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या

महिन्याला ५०० जण होताहेत नापास

By admin | Updated: January 6, 2015 00:34 IST

संकेतस्थळावर अर्ज करावा लागत असल्याने परवाना देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत दर महिन्याला ५०० जण नापास होत आहेत.

पिंपरी : वाहनपरवाना काढण्यासाठी नागरिकांना संकेतस्थळावर अर्ज करुन वेळ घ्यावी लागते. संकेतस्थळावर अर्ज करावा लागत असल्याने परवाना देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत दर महिन्याला ५०० जण नापास होत आहेत. संकेतस्थळावरुन वेळ घेऊन परिक्षेसाठी ८ हजार ८८५ लोकांनी शिकाऊ परवाना काढण्याची परीक्षा दिली आहे. त्यामध्ये ६ हजार ७०२ जण पास झाले तर २ हजार १४३ जण नापास झाले आहेत. संकेतस्थळ सुरु झाल्यापासून नापास होण्याचे प्रमाण वाढले आहे. संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी लागत असल्यामुळे परीक्षा हॉलमध्ये काय होते,याचीही माहिती अद्यावत ठेवावी लागते. सुरुवातीला कार्यालयातून वाहन चालवण्याचा परवाना देण्यात येत होता. त्यामुळे दलालांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने परवाना सहज मिळत असे. ना परीक्षा देण्याचे काम ना गाडी चालवण्याचे त्यामध्ये सगळा गोंधळच होता. पैसे दिले तर कोणालाही सहज परवाना मिळत असे. परवाना मिळाला की गाडी चालवता येते असा समजही संबंधित करुन घेत व गाड्या चालवत त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आपल्या बरोबरच इतर नागरिकांचाही जीव धोक्यात घातला जात असे. त्यामुळे परवाना देतानाच त्यांना वाहन चालवता येते की नाही, रस्त्यावर असलेल्या खुणा, पाट्या याचे अर्थ त्यांना कळतात की नाही, याची तपासणी करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. व त्यामध्ये पास होणाऱ्या नागरिकांनाच शिकाऊ परवाना देण्यात येतो. तर नापास झालेल्या नागरिकांना परत परीक्षा द्यावी लागते. परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तीन महिने त्यांना शिकाऊ वाहन परवाना मिळतो. तीन महिन्यानंतर अधिकाऱ्यांसमोर गाडी चालवून दाखवावी लागते. त्या वेळी त्यांना वाहन चालवण्याचा पक्का परवाना देण्यात येतो. ज्या व्यक्तीला रस्त्यावरील नियम माहिती आहेत. ते सहज या परीक्षेत पास होतात. मात्र, ज्यांना याचा गंध नाही. त्यांना ही परीक्षा अत्यंत कठीण वाटते. परीक्षा हॉलमध्ये जाण्याआधी त्यांना एक पत्रक दिले जाते. रस्त्यावर पुढे धोक्याचे वळण आहे, चढ आहे, घाट आहे, असे अनेक फलक लावलेले दिसतात. ते फलक वाहनचालकाला समजावे. वाहन चालवताना कोणती कागतपत्रे जवळ असावीत, कोणत्या बाजूने वाहन चालवावे यावर यामध्ये प्रश्न विचारले जातात. परीक्षेत एकूण २० प्रश्न आहेत. त्यामध्ये १२ प्रश्नांची बरोबर उत्तरे देतील ते पास होतात. विभागामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि दलालांचा हस्तकक्षेप कमी करण्यासाठी व नागरिकांची कार्यालयात चकरा मारण्याचा त्रास वाचावा यासाठी विभागाने सप्टेंबर महिन्यात संकेतस्थळ सुरु केले. या संकेतस्थळावर नाव नोंदणी केली की त्यांना कार्यालयात येण्याची तारीख व वेळही मिळतो. त्यावेळेला ते हजर झाले की त्यांचा इतर त्रास वाचतो. कामही लवकर होत असल्यामुळे नागरिकांना समाधान मिळते. पूर्वी कार्यालयात गर्दी होत असे. त्यामुळे प्रशासनावर ताण येत होता. चांगल्या प्रकारे काम होत नव्हते. गर्दी कमी करण्यासाठी तातडीने परीक्षा घेऊन गर्दी कमी करण्याचा प्रयत्न होत होता. (प्रतिनिधी)संकेतस्थळावर अर्ज केला जात असल्यामुळे कार्यालयातील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामकाजावरही ताण पडत होता. परवाना देण्याच्या कामामध्ये सुसूत्रता आण्यासाठी संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यांचा चांगला फायदा नागरिकांना आणि प्रशासनालाही झाला आहे. - अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी४संकेतस्थळावर एखाद्या व्यक्तीने अर्ज भरल्यानंतर त्यांना दिवस व वेळ ठरवून दिली जाते. त्या वेळी ते उपस्थित राहिले नाही. तर त्यांना सगळी प्रक्रिया परत करावी लागते. एखादी व्यक्ती नापास झाली तर त्यांना दुसऱ्या दिवशीही परीक्षा परत देता येत आहे, अशी व्यवस्था कार्यालयाने सुरु केली आहे. महिनापासनापासएकूण सप्टेंबर१३३४४९२१८२६आॅक्टोबर१६७६४३९२११५नोव्हेंबर२०७९५९९२६७८डिसेंबर१४८५५८२२०६७जानेवारी१२८३११५९