शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कामशेतमध्ये सहा दुकाने फोडली ; पोलिसांचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 17:47 IST

पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सहा दुकाने फोडण्यात आली आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद रात्री घटनेची माहिती देण्याकरता संपर्क केला असता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडून बेजबाबदारपणे उत्तरे

कामशेत : कामशेत बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सहा दुकानांचे शटर उचकटून सहा दुकाने फोडण्यात आली आहे. तसेच आणखी एका दुकानाचे शटर खोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, एका दुकानदाराने आमच्या दुकानाचे शटर अज्ञात चोरटे तोडत असल्याचा फोन कामशेत पोलीस ठाण्यात कळवूनही पोलिसांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत फोन कट केला. या प्रकरणी दुकानदारांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.   शहरात वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर दहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी शहरातील महत्वाच्या पाच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र,या कॅमेऱ्यांपैकी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एक कॅमेरा सोडला तर सर्व कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद आहेत.व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी(दि. १४) रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास शहरातील पारस परमार (फर्निचर दुकान),आनंद हिंगडे (इलेक्ट्रोनिक दुकान) ,विकास ननावरे (फुट वेअर),सहदेव केदारी  (मोबाईल शॉपी),कांतीलाल भाटी (कपड्याचे दुकान) रामलाल प्रजापती (किराणा दुकान)आदींची दुकाने फोडण्यात आली आहे. शटर उचकटत दुकानातील पैसे व किरकोळ सामानाची चोरी करण्यात आली आहे. तर कमल मेन्सवेअर या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न झाला. सर्वच दुकानांतील सुट्टे पैसे चोरीला गेली असून मोबाईल शॉपी मधील जास्त ऐवज चोरीला गेला आहे. सर्व मिळून सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चोरी झाली असल्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवण्यात आली आहे. संबंधित पोलीस ठाण्यात रात्री घटनेची माहिती देण्याकरता संपर्क केला असता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडून बेजबाबदारपणे उत्तरे मिळाली. तसेच घटनास्थळी ते वेळेवर दाखल झाले नाही.तसेच व्यापारी वर्गाने लाखो रुपये देऊन बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुमारे सहा महिन्यांपासून बंद आहेत.वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.

टॅग्स :kamshetकामशेतCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे