शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काटेवाडीच्या अंगणी मेंढ्या धावल्या रिंगणी...; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 14:02 IST

काटेवाडीत आगमन झाल्यानंतर परीट समाजाच्यावतीने अंथरलेल्या धोतराच्या पायघड्यांवरून पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

गजानन हगवणे -

काटेवाडी (जि. पुणे) : बारामती येथे विसावा घेतल्यानंतर बुधवारी सकाळी सणसरच्या (ता. इंदापूर) दिशेने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने प्रस्थान केले. यावेळी वाटेवर काटेवाडी येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडले. यावेळी हजारो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.काटेवाडीत आगमन झाल्यानंतर परीट समाजाच्यावतीने अंथरलेल्या धोतराच्या पायघड्यांवरून पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गावच्या वेशीपासून ग्रामस्थांनी पालखी खांद्यावरुन दर्शन मंडपात नेली. परीट समाज बांधवांच्यावतीने स्वागतासाठी पांढऱ्या शुभ्र धोतराच्या पायघड्या अंथरल्या. श्री छत्रपती हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथक स्वागत करताना अग्रस्थानी होते. वाद्याच्या गजरात दुपारी बाराच्यादरम्यान पालखी ओटा येथे सोहळा दुपारी विसावला. यावेळी दर्शन मंडपात दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.त्यानंतर दुपारी ३ वाजता पालखी रथात आणण्यात आली. यावेळी बारामती-इंदापूर रस्त्यावर संभाजी काळे, तात्यासाहेब मासाळ, महारनवर यांच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. यावेळी भाविकांनी श्री ज्ञानदेव तुकारामाचा गजर केला.

...तेव्हापासून मेंढ्यांच्या रिंगणाची परंपरा-    संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. -    पूर्वीच्या काळात संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जात असताना काटेवाडी येथील मेंढपाळांनी मेंढ्यांची रोगराई जाण्यासाठी पालखी रथाभोवती मेंढ्यांचे रिंगण घातले होते. -    तेव्हापासून ही आगळीवेगळी परंपरा भाविकांनी श्रद्धेने जपली आहे. 

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशी