शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पुण्यात नवरात्र उत्सवानिमित्त होणारे 'सेक्स तंत्र' शिबिर अखेर रद्द

By नम्रता फडणीस | Updated: September 16, 2022 19:30 IST

’सेक्स तंत्र’ च्या जाहिरातीमध्ये दि. 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान 3 दिवस 2 रात्र लैंगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविला जाणार होते

पुणे : सोशल मीडियावर ‘सेक्स तंत्र’ नावाने नवरात्र विशेष शिबिराची जाहिरात झळकल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. सामाजिक व राजकीय संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर उत्तर प्रदेशमधील सत्यम शिवम सुंदरम फौंडेशनचे प्रमुख रवी सिंग यांच्याशी यासंदर्भात पोलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर हे शिबिर आम्ही रद्द करीत असल्याचे फौंडेशनने सांगितले.

’सेक्स तंत्र’ च्या जाहिरातीमध्ये दि. 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान 3 दिवस 2 रात्र लैंगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविला जाणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने सर्वत्र याच जाहिरातीची चर्चा रंगली होती. सत्यम शिवम सुंदरम फौंडेशनतर्फे या प्रशिक्षण शिबिराची जाहिरात करण्यात आली होती. जाहिरातील अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी एक क्रमांक देण्यात आला होता. या अभ्यासक्रमासाठी एका व्यक्तीकडून 15 हजार रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच यात वैदिक सेक्स तंत्रासह चक्र अँक्टिव्हेशन, ओशो मेडिएशन सारख्या विविध गोष्टी शिकविल्या जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. व्हॉटसपसाठी अ101 असा कोडही देण्यात आला होता. नवरात्र उत्सावाच्या निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली आहे. त्याबाबत सोशल मीडियावर जाहिरातींचा मोठा मारा करण्यात आला. सामाजिक व राजकीय संघटनांनी शिबिराला विरोध दर्शविला आहे.

याविषयी सांगताना सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार म्हणाले, आम्ही इंटरनेटवरून फौंडेशनशी संपर्क साधला. फौंंडेशनच्या प्रमुखांशी बोलणे झाले. या शिबिरासाठी नावनोंदणी झालीच नाही. त्यामुळे जागा निश्चित केलेली नव्हती. बुकिंग झाल्यावर जागा ठरविण्यात येणार होती. त्यात नग्नता काहीच नव्हती असे त्यांचे म्हणणे होते. पण ज्या पद्धतीने जाहिरात झाली ते आक्षेपार्ह आहे असे सांगितल्यावर हे शिबिर त्यांनी रददकेले.

टॅग्स :PuneपुणेSexual Healthलैंगिक आरोग्यPoliceपोलिसsex crimeसेक्स गुन्हा