शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारांना जनता जागा दाखवेल; हे सरकार एक महिन्यात पडणार - अदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 10:25 IST

मला जनतेला त्यांचा खरा चेहरा दाखवायचा आहे

पुणे : या राज्यात दोन लोकांचे जम्बो सरकार आहे. पुण्यातील एक गद्दार त्यांच्या मागे मंत्री बनण्यासाठी फिरत आहे. हे बंड वगैरे काही नाही, निव्वळ गद्दारीच आहे. हे सरकार एक महिन्यात पडणार असून गद्दारांना जनता जागा दाखवेल, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद निष्ठा यात्रा सुरू केली. त्यानिमित्ताने मंगळवारी कात्रज चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तिला मोठा प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांनी लोकांशी संवाद साधताना त्यांना तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहात का अशी भावनिक आवाहन केले.

आदित्य ठाकरे म्हणाले, मी वयाचे भान ठेवून बोलत आहे. मी माझ्या मनातील बोललो नाही. आक्रमक झालो नाही. कोणाविषयीही माझ्या मनात राग किंवा द्वेष नाही. आपला महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पुढे जात असताना या १२ खासदार व ४० प्लस १० आमदार यांनी राज्याच्या जनतेशी गद्दारी केली, त्यांच्यावर काही दडपण होते ना आनंदात जा, जनतला याची जाणीव आहे. तुम्ही भगव्या झेंड्याशी गद्दारी केली. माणुसकीशी गद्दारी केली. ते म्हणतात, आम्ही बंड केले आहे. बंड करणारे सुरतला गोवाहाटीला पळून गेले. ज्यावेळी हे हॉटेलमध्ये मजा मारत होते. आसाममधील जनता पुरात अडकलेली होती. हे खरे शिवसैनिक असते तर मदतीला धावून गेले असते. मला जनतेला त्यांचा खरा चेहरा दाखवायचा आहे. त्यामुळे मी या शिवसंवाद निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांवर टीका

आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मी वयाच्या ५ वर्षाचा असल्यापासून राजभवनात जात आहे. अगोदर त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अनुदार काढले. त्यानंतर आपल्या शिवरायांविषयी बोलले. आता त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे.यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सचिन अहिर, माजी मंत्री शशिकांत सुतार, रघुनाथ कुचिक, आदित्य शिरोडकर, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे यांची भाषणे झाली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा