शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
2
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
3
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
4
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
5
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
6
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
7
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
8
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
9
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
10
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
11
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
12
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
13
Tanya Mittal : "कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
14
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
15
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
16
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
17
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
18
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
19
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
20
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचे सरकार आल्यामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न वेगाने सुटतील - लक्ष्मण हाके

By राजू हिंगे | Updated: November 25, 2024 21:01 IST

हाके म्हणाले,'जरांगे यांनी आरक्षणाबाबत सतत बदलती भूमिका घेतली. त्यामुळे मराठा समाजात मतभेद निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला.'

पुणे : राज्यात आता महायुतीचे सरकार आल्यामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न वेगाने सुटतील. विधानसभा निवडणुकीचा निकाल ही मनोज जरांगे-पाटील यांना चपराक आहे. यंदाच्या निवडणुकांना जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु ओबीसी समाजाने आपली ताकद दाखवून दिली आहे, असे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हाके म्हणाले, जरांगे यांनी आरक्षणाबाबत सतत बदलती भूमिका घेतली. त्यामुळे मराठा समाजात मतभेद निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत पावले उचलली. ती सर्वांनाच मान्य होती, परंतु मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी समाजातूनच आरक्षण पाहिजे होते. हा त्यांचा हेकेखोरपणा आहे. मराठा समाजात जागरूकता निर्माण करण्याऐवजी जरांगे राजकारण खेळू लागले. ठराविक पक्षाला निवडून आणा, ठराविक पक्षाचे उमेदवार पाडा, ही त्यांची भूमिका नागरिकांना पटली नाही. त्यामुळे त्यांनी विरोध केलेले उमेदवारही विविध ठिकाणी सहज निवडून आले, असे हाके यांनी सांगितले. मला मंत्री करावेराज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे, यामध्ये ओबीसी समाजाचा मोलाचा वाटा आहे. या समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी मी राज्यभर दौरे केले. त्याचा उपयोग महायुतीला झाला. त्यामुळे माझ्या क्षमता लक्षात घेऊन मला कॅबिनेट मंत्रिपद दिले पाहिजे. केवळ विधान परिषदेवर जाण्यात मला स्वारस्य नाही, अशी मागणी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडे केली असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेlaxman hakeलक्ष्मण हाकेOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणMahayutiमहायुती