शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बारामती लोकसभेचा पुढचा खासदार भाजपाचाच होणार; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 21:20 IST

काटेवाडी: राष्ट्र निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन करून २०२४ चा पुढचा खासदार भाजपचाच ...

काटेवाडी: राष्ट्र निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन करून २०२४ चा पुढचा खासदार भाजपचाच होणार आहे, असे सुतोवाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काटेवाडी गावात आयोजित केलेल्या बुथ कमिटी आढावा बैठकीत ते बोलत होते.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पुढे म्हणाले की, भाजपने आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी बुथ कमिटीला मार्गदर्शन केले. मनपरिवर्तन करण्यासाठी त्यांनी कानमंत्रही दिला. आपल्या तोंडावरील मास्क बारामतीने काढला नाही तर तो मास्क प्रंतप्रधान मोदींनी काढला. परकीयांचे आक्रमक धुडकावण्यासाठी प्रंतप्रधान मोदी सक्षम आहे. देशात चांगले किल्ले ढासळले आहेत फक्त बारामती मतदारसंघ राहिला आहे. यासाठी मतदारांचे मनपरिवर्तन करणे गरजेचे आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल चढवला. इथल्या कार्यकर्त्यांला अधिकाऱ्यांचा त्रास होत असेल तर फडणवीस यांच्या कानावर घालणार आणि कार्यकर्त्यांचा त्रास दूर करणार, असंही बावनकुळे म्हणाले. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कन्हेेेेरी येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.

यावेळी भारतीय जनता पार्टी काटेवाडी शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी केले यावेळीमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जालिंदर भेगडे, वासुदेव काळे, रंजन तावरे, उपस्थित होते .

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवार