शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीनं खालच्या पातळीचं राजकारण केलं; मेघडंबरीबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 20:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले होते

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. सत्ताधारी भाजपच्या वतीने उत्कृष्ट मेघडंबरी आणि त्यात सिंहासनाधिष्ठित महाराजांची मूर्ती या आवारात उभारण्यात आली. पण काल या मेघडंबरीचा थोडा भाग खाली पडला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी महापालिकेच्या आवारात आंदोलन केले. मेघडंबरीचे काम गळून पडल्याचाही आरोप राष्टवादीने केला होता. यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महापालिकेच्या आवारातील मेघडंबरीबाबत राष्ट्रवादीने खालच्या पातळीचं राजकारण केलं असल्याचे मोहोळ यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून यावेळी सांगितले आहे.   

मोहोळ म्हणाले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या अफवा पसरवल्या आहेत. मी पुणेकरांना वास्तव सांगण्यासाठी समोर आलो आहे. सर्वांना    लोकशाहीचा अधिकार आहे. त्यांनी आंदोलन केलं याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्द्दल अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण त्यांनी केलं. आणि महापालिकेच्या आवारात जाऊन सांगितलं की, मेघडंबरी च काम गळून पडलं, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने असं काम केलं. असे त्यांनी आंदोलन केलं. अनेक वेळा त्यांच्या नेत्यांनी यांचे कान टोचले आहेत. परंतु पुणेकर आणि आम्ही त्याना गांभीर्याने घेत नाही. गेली ७० वर्षे महापालिकेत ही मंडळी सत्तेत होती. तेव्हा त्यांना पुतळा उभारता आला नाही. महापालिकेत स्मारक उभारले याचा पुणेकरांना अभिमान आहे. आम्ही भाजपच्या वतीने राष्ट्रवादीच्या प्रत्येक नगरसेवकाला निमंत्रण दिले होते. पण एकही नगरसेवक उपस्थित राहू शकला नाही. तेव्हा कुठं गेली होत यांची आत्मीयता. मात्र मेघडंबरीबाबत आंदोलन करायला तातडीने आले. 

असा प्रसंग का घडला; महापौरांचे स्पष्टीकरण 

मेघडंबरीला डेकोरेशन करण्याबरोबरच विद्युत रोषणाई करण्यात आली होती.  त्यामुळे ते अत्यंत देखणे दिसत होते. त्याठिकाणी लाईट्स काम सुरु असताना मेघडंबरीला थोडा धक्का लागून एक तुकडा खाली पडला. हा छोटासा अपघात होता. राष्ट्रवादीने मात्र राजकारण केलं. मेघडंबरीचा भाग गळून पडला, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने हे काम केलं असं राजकारण केल. असंही ते यावेळी म्हणाले आहेत.   

टॅग्स :MayorमहापौरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस