शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय पुरंदरेंकडूनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 05:42 IST

शरद पवार यांचे विधान : महाराजांच्या खऱ्या गुरू जिजाऊच

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेकांनी लेखन केले आहे; मात्र त्यांच्यावर सर्वाधिक अन्याय बाबासाहेब पुरंदरेंकडूनच झाला, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. तसेच महाराजांचे गुरू रामदास किंवा दादोजी कोंडदेव नव्हे, तर जिजाऊ माँ साहेबच आहेत, असेही ते म्हणाले.

इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या शिवचरित्र आणि विचारप्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी सकाळी पद्मावतीमधील अण्णा भाऊ साठे सभागृहात झाले. त्यावेळी पवार बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज होते. इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पवार यांनी शिवचरित्र लेखन व लेखकांचा विस्ताराने आढावा घेतला. ते म्हणाले की, वास्तव इतिहास काय आहे, त्याचे लेखन अभ्यासपूर्वक करणे आवश्यक आहे. शिवछत्रपतींचे गुरू राजमाता जिजाऊ याच होत्या. दादोजी कोंडदेवांना गुरुस्थानी बसविणे पूर्णत: अनैतिक आहे.

डॉ. कोकाटे यांनी मनोगत व्यक्त करताना लेखनामागची भूमिका विशद केली. शिवरायांच्या इतिहासाने अनेक विचारप्रवाहांना प्रभावित केले आहे. त्यांच्याकडून त्यावर लेखन झाले आहे. ते समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

जेम्स ग्रँट डफ याने मराठ्यांच्या इतिहासाचे चार खंड लिहिले आहेत. मला त्यातील दोन खंड मिळाले. मी ते विकत आणले, वाचले. ते संपूर्णपणे निर्दोष होते, असे म्हणता येणार नाही. त्याचाच आधार घेत बाबासाहेब पुरंदरे यांनी भाषणे केली, लेखन केले.     - शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSharad Pawarशरद पवार