शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ससूनच्या खिडकीत बसून ड्रग माफिया ओढायचा सिगारेट; गर्लफ्रेंडसोबत ललित पाटीलचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 06:35 IST

पंचतारांकित हॉटेलमध्ये मैत्रिणीसोबत फोटोसेशन

- नितीश गोवंडेलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा केवळ न्यायालयात दाखवण्यासाठी कैदी होता व ससूनला त्याने अय्याशीचा अड्डा बनविला होता. त्याचे ससून रुग्णालयाच्या खिडकीत बसून सिगारेट ओढतानाचे फोटो समोर आल्यानंतर या सर्व बाबींना पुष्टी मिळाली आहे. मुंबई पोलिसांना चौकशीदरम्यान ललितने रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना पैसे देऊन मॅनेज करत असल्याचे सांगितल्याने, ललित ससूनमधील त्याचा मुक्काम डॉक्टरांना पैसे देऊन वाढवत असल्याची माहितीही समोर आली आहे.

रुग्णालयापासून जवळच असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याची प्रेयसी प्रज्ञा कांबळेसोबत तो रोमान्स करत असतानाचेही फोटोतून स्पष्ट होत आहे. ललित हॉटेलसह मॉलमध्ये खरेदी करतानाचे फोटोही समोर आल्याने ललित पैशांच्या जोरावर कैदी असतानाही अय्याशी करत जगत असल्याचे दिसून येते.

मोक्काअंतर्गत कारवाई?ललित आणि त्याच्या टोळीविरोधात पुणे पोलिसांकडे अनेक पुरावे असून, पोलिसांनी या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. 

‘आपलं नाव तर घेणार?’ललितला मदत करणाऱ्यांची मात्र धकधक वाढली आहे. ललित आपले नाव तर घेणार नाही ना, हा प्रश्न त्यांची चिंता वाढवत आहे. 

गर्लफ्रेंड कोण?ललितची गर्लफ्रेंड प्रज्ञा कांबळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ललित अथवा त्याच्या टोळीतील सदस्य गुन्ह्यात पकडला गेलाच तर त्यांना जामिनावर बाहेर काढण्याची जबाबदारी प्रज्ञा कांबळेवर असायची. 

दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटकललित याच्या दोन मैत्रिणींना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. ससून रुग्णालयातून ललित पळून गेल्यानंतर या दोघींनी त्याला २५ लाख रुपये दिले होते. न्यायालयाने दोघींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

अर्चना किरण निकम (वय ३३), प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (३९, रा. नाशिक) अशी अटक केलेल्या दोघींची नावे आहेत. ललितने पळून जाण्यापूर्वी दोघींची ससूनमध्ये भेट घेतली. पलायन केल्यानंतर ४ व ५ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे पुन्हा या दोघींची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघींनी त्याला २५ लाख रुपये दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

ललितला पळून जाण्यासाठी कट रचण्यात आला असून, त्याअनुषंगाने भेटीची ठिकाणे व गुन्ह्यांचे पुरावे दोघींकडून जप्त करायचे आहेत. त्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नीलम यादव-इथापे यांनी केली. 

ललितची सफारी गॅरेजबाहेर धूळखात नाशिक : ललितची एक काळ्या रंगाची टाटा सफारी गाडी आठ ते दहा वर्षांपासून एका गॅरेजबाहेर धूळखात पडल्याचे शहर पोलिसांना आढळले आहे. गॅरेज चालकाकडे गाडी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर पाटीलने कुठलाही पुढे पाठपुरावा केला नाही.

टॅग्स :Lalit Patilललित पाटील