शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Neelam Gorhe: "गेलेले एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल..." नीलम गोऱ्हे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 18:36 IST

राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरु झाले आहेत

पुणे : राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरु झाले आहेत. शिवसेनेतून अनेक माणसे निघून चालली आहेत. पण आम्ही गेलेल्या लोकांचा शोक करत बसणार नाही. काही दिवसांनी ते एकत्र येतील आणि नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल. असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. 

 पुण्यात प्रभाग क्रमांक १० येथे विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यचा वाटपचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राजू पवार यांनी केले होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर गोऱ्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.  

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेला वारंवार धक्के बसू लागले आहेत. आमदार यांच्या पाठोपाठ नगरसेवक, जिल्हाप्रमुख, शाखा अध्यक्ष शिंदे गटात प्रवेश लागले आहेत. या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गोऱ्हे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेचे २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण आहे तेच आमचं चालले आहे. राजकारणाचा आवाका खूप मोठा झाला आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने वाद सुरु झाले आहेत. मी एक भगवत गीतेवर विश्वास ठेवणारी नास्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत त्यांचा शोक करत बसणार नाही. काही दिवसांनी ते पुन्हा एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह सुरु होईल. मंत्रमंडळाच्या विस्ताराबाबत बोलायचं झालं तर, सरकारला शक्य होईल तेव्हा त्यांनी विस्तार करावा. 

सरकारने जनतेच्या बहुमताचा विचार करावा 

संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतराबाबत गोऱ्हे म्हणाल्या,  आता असं दिसतंय कि, कायदा नक्की तो काय आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगत असते. पण आम्ही सांगतो तो कायदा असा अविर्भाव कोणी घेतला तो जास्त काळ टिकत नाही. असे माझ्या अनुभवाचे बोल आहे. त्यामुळे संभाजी नगर अथवा धाराशिव यांच्या नामांतराबाबत अल्पमत आणि बहुमताचा विचार करयाचा नसतो जनतेच्या बहुमताचा विचार करावा असे मला वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.   

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाSocialसामाजिकEknath Shindeएकनाथ शिंदे