शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई योग्य

By नम्रता फडणीस | Updated: November 26, 2024 21:25 IST

विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांचा आयोगासमोर अंतिम युक्तिवाद सुरु

पुणे : कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळल्यानंतर झालेली जाळपोळ ही एकाजागी न होता शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगावसह अन्य ठिकाणी देखील झाली. मात्र, पोलिसांनी जातीय दंगली कशा हाताळायच्या त्याच्या नियमावली प्रमाणेच कारवाई केली आहे.

तसेच लाखो लोक असूनही पोलिसांनी कोणतीही जीवित हानी होऊ दिली नाही, इतकी गंभीर परिस्थिती असतानाही पेरणेफाटा येथे भाविक पोलिसांमुळेच व्यवस्थित दर्शन घेऊ शकत होते. त्यामुळे पोलीसांनी केलेली कारवाई योग्य होती अशा मुद्द्यांवर विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी चौकशी आयोगासमोर मंगळवारी ( दि.28) युक्तिवाद केला. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार उसळला होता.

या प्रकरणी राज्य सरकारने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त न्यायमूर्ती जे. एम. पटेल आणि माजी सचिव सुमीत मलिक यांच्या चौकशी आयोगाची स्थापना केली होती. या आयोगापुढे ५३ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, आयोगाचे पुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम युक्तिवाद दाखल करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार विशेष सरकारी वकील हिरे यांनी मंगळवारी (दि. २६) चौकशी आयोगासमोर अंतिम युक्तिवादाला सुरूवात केली.कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळल्यानंतर त्याचे पडसाद अन्य ठिकाणी देखील उमटले. शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव सह अन्य भागात ही जाळपोळ पसरली होती. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक त्यावेळी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले होते. मात्र, पोलीसांनी योग्य ती कारवाई करत जाळपोळ आटोक्यात आणली. लाखो लोक असूनही कोठेही चेंगरा-चेंगरीची घटना किंवा जीवित हानी होऊ दिली नाही. महिला, लहान मुलांना देखील सुखरूप सोडवले. आंदोलनावेळी अचानक हल्ला झाल्यामुळे एका तरूणाचा मृत्यू झाला होता. मात्र, या घटनेचा कोणताही परिणाम होऊ न देता पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली, असा युक्तिवाद अॅड. हिरे यांनी केला. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी शुक्रवार (दि. २९) पर्यंत सुरू राहणार आहे, असेही अॅड. हिरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक