शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे कुटुंबाची सून, मंत्री भरणेंचे चिरंजीव; जिल्हा परिषद निवडणुकीत नेत्यांची मुले रिंगणात!

By किरण शिंदे | Updated: January 23, 2026 23:47 IST

पुणे जिल्ह्याचे राजकारण पुन्हा तापू लागले आहे. पुणे जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समित्यांची निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यकारण्यांच्याच वारसादारांची चर्चा सुरू आहे. 

- किरण शिंदे, पुणे पुणे जिल्ह्यात सध्या  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यानिमित्ताने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा घराणेशाहीची चर्चा रंगली आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांची दुसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मतदारांचा कल कोणाकडे झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यातील प्रस्थापित राजकीय घराण्यांतील वारसदारांची मोठ्या प्रमाणात एन्ट्री होताना दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित न राहता, दुसऱ्या पिढीची राजकीय कसोटी म्हणून पाहिली जात आहे.

राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिल्यांदाच आपले चिरंजीव श्रीराज भरणे यांना राजकारणात उतरवले आहे. इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समितीच्या निवडणुकीतून श्रीराज भरणे आपले राजकीय नशीब आजमावणार आहेत. भरणे कुटुंबीयांची इंदापूर तालुक्यात मजबूत पकड असून, मतदार घराणेशाहीला संधी देतात की नव्या चेहऱ्यांकडे पाहतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अंकिता पाटील-ठाकरे दुसऱ्यांदा रिंगणात

दुसरीकडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या सलग दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या बावडा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील निवडणुकीचा अनुभव आणि ठाकरे कुटुंबाशी असलेले नाते, हे घटक त्यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत.

शिरूर तालुक्यातही घराणेशाहीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भाजपामध्ये प्रवेश करून जिल्हा परिषदेच्या टाकळी हाजी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षांतर करून निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णयही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे या निवडणुकीत अनेक प्रस्थापित कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

एकीकडे अनुभव, ओळख आणि राजकीय वारसा; तर दुसरीकडे बदलाची अपेक्षा आणि नव्या नेतृत्वाची मागणी या दोन्हीमध्ये मतदार नेमका कोणता निर्णय घेतो, हे आगामी निकालातून स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक यंदा घराणेशाहीला मतदार थारा देतात की नाकारतात, याचा कौल ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dynasty Politics: Leaders' Children Contest District Council Elections in Pune

Web Summary : Pune Zilla Parishad elections see established leaders' offspring entering the fray. Bharnes' son and Ankita Patil-Thackeray are contesting. Voters will decide between dynasty and new leadership.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलzpजिल्हा परिषद