शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

आत्मविश्वासाने जा परीक्षेला

By admin | Updated: February 19, 2016 01:16 IST

सलग दोन दिवसांत हृषीकेश तापकीर व प्रतीक पाटील या महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत वातारवण

पिंपरी : सलग दोन दिवसांत हृषीकेश तापकीर व प्रतीक पाटील या महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत वातारवण चिंतातुर झाले आहे. यामुळे पालकांचीही धास्ती वाढली आहे. नैराश्यातून विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. अभ्यासाचा ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेला निर्भयपणे सामोरे जाणे गरजेचे आहे. बारावीची परीक्षा तोंडावर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुलांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याइतपत काय घडले? या आत्महत्येमागील नेमके कारण समजून घेऊन परीक्षेच्या कालावधीत वातावरण आनंदी कसे राहील, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थी वसतिगृहावर राहतात. यामुळे घरच्यांशी फार कमी संवाद होते. आपल्या मुलाला शिकण्यासाठी बाहेर ठेवले आहे, पालकांना ही अभिमानाची बाब वाटते. घरच्यांशी संभाषण झाले तरीही ते कमी प्रमाणात, तसेच अभ्यासाबद्दल होते. त्यातच वसतिगृहाची फी तसेच दैनंदिन खाण्याचा खर्च दिलेल्या पैशात होत नाही. शिक्षणासाठी परगावी राहिल्यानंतर पैशांचीही चणचण भासते. बाहेरगावावरून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. यामुळे महाविद्यालयांनीही तितके सतर्क राहणे गरजेचे आहे. पाल्यावर असलेल्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे परीक्षेत मुलाला कमी गुण मिळाले अथवा परीक्षेत नापास झाला, तर त्या पाल्याला घरच्यांची जास्त भीती वाटते, त्यातूनच ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात. बारावीत शिकणारा हृषिकेश तापकीर याने घरातील अभ्यासखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. १७ फेब्रुवारीला ही घटना घडली. मात्र, परीक्षेच्या कालावधीत आत्महत्या झाल्याने परीक्षेच्या तणावामुळेच आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अजिंक्य डी. वाय पाटील कॉलेजमध्ये २० वर्षे वयाच्या प्रतीक पाटीलने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. सत्र परीक्षेत सहापैकी पाच विषयांत तो नापास झाला होता. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा येणारा अतिरिक्त ताण, तसेच अभ्यासामुळे येणारा एकलकोंडेपणा आत्महत्येला कारणीभूत ठरत आहे. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रेमसंबंध, करिअरमधून नैराश्यामुळे असे प्रकार घडत आहेत. (प्रतिनिधी)