शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

साताऱ्यातील साडी सेंटर लुटून दहशतवाद्यांनी खरेदी केले बॉम्बचे साहित्य

By नम्रता फडणीस | Published: March 13, 2024 9:28 PM

विशेष न्यायालयाने सुनावली २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

पुणे: गेल्या वर्षी इस्लामिक स्टेट (आयएस) संघटनेच्या अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी सातारा महामार्गावरील अजंठा चौकातील गणपती सिल्क साडीसेंटरवर दरोडा टाकून लुटलेल्या एक लाख रुपयांतून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य खरेदी केल्याची धक्कादायक माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस)तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी ‘एटीएस’ने महंमद शहानवाज आलम खान उर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहिम (वय ३१, रा. झारखंड), महंमद युनूस महंमद याकू साकी उर्फ छोटू(वय २४, रा. रतलाम) आणि झुल्फिकार अली बडोदावाला उर्फ लाला उर्फ लालाभाई (रा. मुंबई) यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २१ मार्चपर्यंतपोलिस कोठडी सुनावली.

सातारा महामार्गावरील अजंठा चौकातील गणपती सिल्क साडी सेंटरमध्ये ८ एप्रिल २०२३ रोजी रात्री नऊच्या सुमारास ही लुटमारीची घटना घडली होती. यादुकानाचे व्यापारी रात्री दुकान बंद करत असताना अचानक दोघेजण दुकानात शिरले. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानाच्या गल्ल्यातून तीन दिवसांतजमा झालेली एक लाख रुपयांची रोकड लुटली. त्यानंतर दुचाकीवरून पोबारा केला. या घटनेनंतर या विक्रेत्याने सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीहोती.

दरम्यान, कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरताना तिघांना पकडले होते. हे तिघे संशयित दहशतवादी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर यागुन्ह्याचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्यात आला होता. दरम्यान याच दहशतवाद्यांनी साताऱ्यातील व्यापाऱ्याला लुटल्याचे ‘एटीएस’च्या तपासातनिष्पन्न झाले आहे. या तीनही आरोपींविरोधात बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यासह (यूएपीए) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआरोपींनी साडीचे दुकान लुटून तो पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला आहे.

त्यांनी या पैशातून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य कुठून खरेदी केले, या लुटमारीसाठी बंदूक कोठून आणली होती, याचा तपास करायचा आहे, तसेच यागुन्ह्यात त्यांनी वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. त्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली.न्यायालयाने ती मान्य करत, आरोपींना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे