शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

करदात्यांच्या विम्याची निविदा रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 03:10 IST

महापालिकेची पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना

पुणे: जास्तीत जास्त पुणेकरांनी नियमित कर भरावा यासाठी महापालिकेकडून करदात्यांसाठी खास अपघात विमा योजना सुरु करण्यात आली. परंतु अपघात विमा योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या विमा कंपनीची नियुक्तीची निविदा प्रक्रियाच न राबविल्याने शहरातील लाखो प्रामाणिक करदाते विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे.

महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आपल्या पहिल्या अंदाजपत्रकामध्ये नियमित कर भरणाऱ्या करदात्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना सुरु करण्यात आली. त्यानंतर सन २०१८-१९ मध्ये योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करण्यात आली. या योजनेअतंर्गत ज्याच्या नावावर मिळकत असेल व नियमित मिळकत कर भरणाऱ्या करदात्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपघाताने कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला तब्बल ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. पहिल्याच वर्षी केवळ १५ करदात्यांना विमा योजनेचा लाभ झाला आहे. महापालिकेच्या वतीने सन २०१८-१९ या वर्षांसाठी निविदा काढून न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीशी करार करण्यात आला होता. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ साठी ही योजना लागू राहणार होती. यामुळे ३१ मार्चपर्यंत कर भरणाºया व्यक्तींना योजनेचा लाभ मिळणार आहे.नावावर मिळकत असणाºयाला लाभ : लाखो पुणेकरांना फटकामहापालिकेच्या वतीने सुरू केलेल्या योजनेचा लाभ पहिल्या वर्षी केवळ ज्या व्यक्तींच्या नावावर मिळकत आहे त्यालाच मिळत होते. परंतु आता संपूर्ण कुटुंबाला विमा योजनेचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. परंतु ही प्रक्रिया वेळेत सुरु न केल्याने अद्याप नवीन कंपनी निश्चित झाली नाही.त्यात आता लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली असून, २७ मे पर्यंत निविदा प्रक्रिया राबविता येणार नाही. यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून विमा योजना लागू होण्यासाठी जून-जुलै उजाडणार आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१९ पासून मिळकत कर भरणाºया पुणेकरांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका प्रशासनाच्या या कारभाराचा फटका लाखो पुणेकरांना बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सर्वांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करूमहापालिकेच्या वतीने करदात्यांसाठी सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेमध्ये काही बदल केले असून, आता संपूर्ण कुटुंबाला विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने निविदा प्रक्रिया रखडली आहे. यामुळेच निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी कर भरणाºया सर्व करदात्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येतील.- रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका