शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

लाेकसभेच्या निवडणुकांचे भविष्य सांगा आणि 21 लाख जिंका ; अंनिसचं ज्यातिषांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 20:40 IST

सतराव्या लाेकसभा निवडणुकीचे भविष्य अचूक वर्तवणाऱ्याला लवकरच अंनिस 21 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करणार आहे.

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) तर्फे ज्याेतिषांसाठी एक आगळी वेगळी ऑफर पुन्हा एकदा जाहीर केली आहे. सतराव्या लाेकसभा निवडणुकीचे भविष्य अचूक वर्तवणाऱ्याला लवकरच अंनिस 21 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करणार आहे. गेल्या लाेकसभेच्या निवडणुकीवेळी देखील असेच आव्हान अंनिस तर्फे देण्यात आले हाेते. परंतु तेव्हा काेणीही ज्याेतिष पुढे आले नव्हते. यंदा पुन्हा अंनिसतर्फे एका परिपत्रकाद्वारे ज्याेतिषांना आव्हान देण्यात आले आहे. 

28 फेब्रुवारी 2014 राेजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंनिस तर्फे अचूक भविष्य वर्तवणाऱ्या ज्यातिषांसाठी 21 लाख रुपयांचे बक्षिस जिंकण्याची संधी महाराष्ट्र अंनिसने दिली हाेती. त्याच धर्तीवर सतराव्या लाेकसभा निवडणुकीचे भविष्य ज्याेतिषांनी वर्तवावे असे आव्हान महाराष्ट्र अंनिसतर्फे देण्यात येत आहे. असे राज्य कार्यध्यक्ष अविनाश पाटील यांनी जाहीर केले आहे. या आव्हान प्रक्रियेचे तपशिल आणि वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच प्रतिथयश ज्यातिष संस्था व व्यक्तिंना व्यक्तिशः पाठविले जाणार आहे असेही सांगण्यात आले आहे. 

2014 मध्ये झालेल्या लाेकसभा निवडणुकांमध्ये सहभागी झालेल्या विविध पक्षांना मिळणाऱ्या जागा, निवडून येणाऱ्या उमेदवरांच्या मतांची टक्केवारी, महत्त्वाच्या  मतदारसंघातील मंत्रिमंडळातील काही सदस्यांची नावे याविषयीचे भविष्य वर्तविले जावे असे आव्हान त्या प्रक्रियेत अपेक्षित हाेते. एकूण 30 प्रश्न विचारलेले हाेते, त्यापैकी 22 प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यास बक्षिस मिळणार हाेते. उत्तरामध्ये पाच टक्के फरक अपेक्षित धरलेला हाेता. परंतु तरीही काेणीही हे आव्हान स्विकारले नव्हते. 

याविषयी बाेलताना अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख म्हणाले, अनेक ज्याेतिषी निवडणुकांचा निकाल सांगू असे भाकित करतात. यात अनेक उमेदवारांची फसवणुक देखील हाेत असते. त्यामुळे अंनिसतर्फे ज्याेतिषांना निवडणुकीचे भविष्य वर्तवण्याचे आव्हान देण्यात आले आहे. ज्यातिषांनी देशाचं नाहीतर एखाद्या उमेदवाराला किती मतं मिळतील हे तरी अचूक सांगून दाखवावे. निवडणुकीत असे फसवणुकीचे अनेक प्रकार घडत असतात, त्यामुळे उमेदवारांनी देखील अशा भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन अंनिसकडून करण्यत येत आहे. तसेच ज्याेतिषांनी भविष्य हे तर्काच्या आधारे नाहीतर उमेदवाराच्या कुंडलीच्या आधारे सांगून अंनिसचे आव्हान स्विकारावे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPuneपुणे