शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाचा गैरवापर अधिक : मोहन आगाशे; पुणे साहित्यिक कलावंत संमेलनात रंगली मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:20 IST

१७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे डॉ. मोहन आगाशे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे, सचिव वि. दा. पिंगळे, शशिकांत देवकर उपस्थित होते. 

ठळक मुद्दे१७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रंगला मुलाखतीचा कार्यक्रममुलांना चांगली शिकवण आणि संस्कार मिळणे गरजेचे : मोहन आगाशे

पुणे : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे संबोधले जाते. या डिजिटलायझेशनच्या युगात मोबाईलचा अतिवापर होत आहे. यामुळे संवाद, भाषा, संपर्क या गोष्टी कमी होताना दिसून येत आहेत. अशा वेळी समाजात तंत्रज्ञानाचा चांगला वापर होण्याचे प्रमाण कमी होऊन त्याचा गैरवापर होत आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.१७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे डॉ. मोहन आगाशे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे, सचिव वि. दा. पिंगळे, शशिकांत देवकर उपस्थित होते. आगाशे म्हणाले, तरुण पिढीचे आयुष्य हे जलद होत चालले आहे. या तंत्रज्ञानामुळे मुले पुढे जात आहेत. त्यांनी मोबाईलचे व्याकरण शिकले पाहिजे. मोबाईलवर फोटो काढून त्याच्या आहारी जाण्यापेक्षा त्या फोटोचा वापर करून त्यापासून चित्रपट निर्माण होऊ शकतो, याचा विचार करायला पाहिजे. पूर्वी चित्रपट निर्मितीसाठी कॅमेऱ्याची गरज होती; पण आता कॅमेरा तुमच्या हातात आहे, त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा. तसेच या काळात भाषेला महत्त्व देणे ही एक मोठी बाब आहे. डिजिटलमुळे साक्षरता वाढत गेली व जग दोन गोष्टींत वाटले गेले. काहींना डिजिटल भाषा कळत होती तर काही लोक यापासून वंचित राहिले. आता या युगात डिजिटल भाषा शिकणे हे खूपच महत्त्वाचे आहे. तरुण पिढी यामध्ये पुढे असून ज्येष्ठ लोक मात्र मागे आहेत. समाज सिनेमा बघायला जाताना तो कुठल्या हेतूने बघतो हे जाणून घेतले पाहिजे. सिनेमा बघताना त्याची निराळी भाषा असते ती आपली ज्ञानेंद्रिये आत्मसात करत असतात. कलेचा हा वेगळाच अनुभव सर्वांनी घ्यावा आणि भाषा हे माध्यम समजून घ्यावे.

मुलांकडून आत्महत्या तरुण मुलांसाठी भारतात पंधरा ते तीस वयोगटातील मुले आत्महत्या करत आहेत. आणि त्याचे सर्वांत जास्त प्रमाण भारत या देशात आहे. तर मुलांना चांगली शिकवण आणि संस्कार मिळणे गरजेचे आहे व सतत निर्माण झालेला तणाव यातूनही बाहेर काढले पाहिजे, असे मोहन आगाशे म्हणाले. 

टॅग्स :Mohan Agasheमोहन आगाशेPuneपुणे