शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

बारामती वैद्यकीय महाविद्यालयासाठी टीम सज्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 19:43 IST

बारामतीमध्ये एमआयडीसी परिसरात महाविद्यालय व रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुमारे १०० डॉक्टरांची नियुक्ती, तीन रुग्णालये करणार एकत्रितपुढील आठवड्यात पाहणी :बारामतीतील इतर तीन रुग्णालये संलग्न करण्यात येणार

पुणे : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्याची चिन्ह आहेत. महाविद्यालयासाठी शासनाकडून सुमारे १०० डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. बारामतीतील तीन शासकीय रुग्णालये संलग्न करून महाविद्यालयाला मान्यता घेतली जाणार आहे. पुढील आठवड्यात ही रुग्णालये व महाविद्यालयाच्या नवीन इमारतीची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय)च्या समितीकडून पाहणी केली जाण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये एमआयडीसी परिसरात महाविद्यालय व रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे ११ लाख ८४ हजार चौरस फुटाचे हे बांधकाम आहे. महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पुर्ण झाले असून रुग्णालयाच्या इमारतीसाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. महाविद्यालयामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पहिल्या वर्षी एमबीबीएसच्या १०० जागांवर प्रवेश देण्याचे नियोजन आहे. पण रुग्णालय इमारतीचे काम अर्धवट असल्याने महाविद्यालयाला मान्यता मिळणे कठीण होते. त्यामुळे बारामतीतील सिव्हर ज्युबली उप जिल्हा रुग्णालय, शासकीय महिला रुग्णालय आणि रूई येथे ग्रामीण रुग्णालय या तीनही रुग्णालयांचा वापर महाविद्यालयासाठी केला जाणार आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे व महाविद्यालयाचे प्रभारी संजयकुमारे तांबे यांनी एमसीआय समोर सादरीकरण करून आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. तसेच महाविद्यालयासाठी ६० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासह इतर शासकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची बदली करण्यात आली आहे. तसेच तीनही रुग्णालयांमधील ४० डॉक्टरही घेण्यात आले आहेत. ही टीम सज्ज झाल्याने एमसीआय कडून होणाऱ्या तपासणीमध्ये अडथळे येणार नाही. पुढील आठवड्यात ही तपासणी होण्याची शक्यता असून त्यामध्ये रुग्णालयांमधील सोयी-सुविधा, तसेच महाविद्यालयाची पाहणी केली जाईल. त्यामध्ये त्रुटी आढळल्यास त्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर पुन्ही पाहणी होऊन मान्यतेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सुत्रांनी सांगितले. ----------पुढील आठवड्यात एमसीआयची समिती पाहणी करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. रुग्णालय इमारतीचे काम अर्धवट असल्याने बारामतीतील इतर तीन रुग्णालये संलग्न करण्यात येणार आहेत. महाविद्यालयासाठी प्राध्यापकांचीही नियुक्ती झाली असून ते सर्व रुजू झाले आहेत. मे अखेरपर्यंत मान्यतेचा निर्णय होऊ शकतो.- डॉ. संजयकुमार तांबे, प्रभारी अधिष्ठाताबारामती शासकीय महाविद्यालय

टॅग्स :BaramatiबारामतीHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल