पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांना गणवेश लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर शिक्षण समितीही या निर्णयावर ठाम राहिली आहे. मंगळवारी झालेल्या बैैठकीत शिक्षकांनी स्वत:हून पुढे होऊन गणवेश मान्य करावा, असे आवाहन केले आहे. अन्यथा एक एक तालुका घेऊन तो लागू केला जाईल, असे शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले.पुणे जिल्हा परिषदेला पंचायतराज समितीने दिलेल्या भेटीत शिक्षकांना ड्रेसकोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शिक्षक संघटनांनी याला तीव्र विरोध केला होता. ‘ड्रेसकोड’बाबतची चर्चा त्वरित थांबवा, असा इशाराच पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्याचे म्हणणे जाणून घेतले होते. आपले विचार पंचायतराज कमिटीपुढे मांडू, असेही त्यांना सांगितले होते.त्यानंतर गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. यात हा विषय मांडला गेला. यावर सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी एकमत दाखवित ठराव मंजूर केला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी याचा सर्वस्वी निर्णय शिक्षण समिती घेईल, असे या वेळी सांगितले होते. यानुसार आज शिक्षण समितीची बैैठक झाली. या बैैठकीत हा विषय चर्चिला गेला. याबाबत वांजळे यांना विचारले असता, आपण या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचाही गणवेश बदलण्याचा विचार केला होता. पण काही अडचणींमुळे तो निर्णय होऊ शकला नाही. मात्र, इंदापूर व बारामती तालुक्यात तेथील जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घेऊन वेगळा गणवेश दिला आहे. (प्रतिनिधी)
शिक्षकांच्या गणवेशावर शिक्षण समितीही ठाम
By admin | Updated: December 9, 2015 00:21 IST