शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

शिक्षक दिन : शिक्षकांमुळे सुटले गणित-इंग्रजीचे कोडे : डॉ. दीपक म्हैसेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 12:16 IST

आमच्यावेळी डॉक्टर आणि इंजिनिअर याच पेशात जाण्यास प्रोत्साहन दिले जात होते. मात्र, वडिलांनी प्रशासकीय सेवेत जाण्यास सुचविले होते.  

ठळक मुद्देप्राथमिक आणि महाविद्यालयातील शिक्षकांचे घडविण्यात योगदान

पुणे : इंग्रजी ही पुढील काळाची गरज असल्याचे ओळखून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असलेली आई आशा आणि महाविद्यालयात प्राचार्य असलेले वडील जी. आर. म्हैसेकर यांनी इंग्रजीची गोडी लावली, तसेच शालेय शिक्षक साबदे यांनी इंग्रजी भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले, तर महाविद्यालयीन काळात वरदाचार्य आणि के. टी. सिद्दीकी यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. माझे गणित थोडे कच्चे होते. शिक्षक हंबरडे यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे मला ९० टक्के गुण गणितात मिळाले. बाराळे, पराशर या शिक्षकांनी भौतिकशास्त्राची व लोहगावकर आणि श्रीमती सिंग यांनी जैवविज्ञानाची गोडी लावली. या सर्व शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळे आज मी इथंवर पोहोचल्याची भावना पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ...माझे प्राथमिक शिक्षण नांदेडमधील जिजामाता स्कूल येथे झाले. पीपल्स कॉलेजमध्ये महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेतले. पुढे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पदवी शिक्षण पूर्ण केले. आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने शिक्षणाचे पहिले बाळकडू घरातूनच मिळाले. शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण घेताना प्रत्येक टप्प्यावर मला चांगले गुरू मिळाले. आजकाल शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारल्यास त्याचा खूप बाऊ केला जातो. मात्र, शालेय वयात मीदेखील शिक्षकांचा मार खाल्ला आहे. त्यामुळेच मी घडलो आणि आम्हा विद्यार्थ्यांना त्या मारामुळेच शिस्त लागल्याचे आज जाणवते. आमच्यावेळी डॉक्टर आणि इंजिनिअर याच पेशात जाण्यास प्रोत्साहन दिले जात होते. मात्र, वडिलांनी प्रशासकीय सेवेत जाण्यास सुचविले होते.  ........शालेय शिक्षक आजही भेटतात...  नांदेडला ज्या जिजामाता शाळेत मी शिकलो तेथे नांदेड आयुक्त म्हणून रुजू झाल्यावर गेलो होतो. त्यावेळी अनेक शिक्षकांची भेट झाली. पुण्याचा विभागीय आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर शिक्षक साबदे यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना मी तुमच्याकडे येतो असे सांगितले. मात्र, त्यांनी नम्रपणे माझी विनंती नाकारत स्वत: कार्यालयात येणे पसंत केले. त्यांचे वय ८० च्या पुढे आहे. मात्र, मला त्या खुर्चीत बसलेले त्यांना पाहायचे होते. म्हणूनच ते कार्यालयात आले.    

टॅग्स :PuneपुणेTeachers Dayशिक्षक दिन