शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कर २ कोटी, थकीत व्याज ४ कोटी, महापालिकेला भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 02:45 IST

दंडाची रक्कम २ कोटी : जाहिरात विभागाकडून महापालिकेला भुर्दंड

पुणे : जाहिरातदारांकडून सेवाकरापोटी रक्कम वसूल केली नसल्याचा चांगलाच फटका महापालिकेला बसला आहे. सेवा कराची रक्कम २ कोटी ८ लाख, ती जमा केली नाही म्हणून त्यावर व्याज ३ कोटी ८० लाख व तेही जमा केले नाही, म्हणून वर दंड म्हणून २ कोटी ८ लाख असा भुर्दंड महापालिकेला पडला आहे.

ज्या अधिकाऱ्यामुळे महापालिकेला हा मोठा आर्थिक फटका बसला त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने जाहिरातफलकांपोटी १ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०११ अखेरपर्यंतचा सेवा करच जाहिरातदारांकडून वसूल केला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या सेवा कर विभागाने महापालिकेला २ कोटी ८ लाख रुपये कोटी सेवा कर जमा करण्याची नोटीस दिली. सन २०१५ मध्ये महापालिकेने कर सल्लागारामार्फत याविरोधात अपील केले. त्याचा निकाल महापालिकेच्या विरोधात गेला.या अपिलास विलंब झाल्याने ते मान्य होणार नाही, असे कर सल्लागाराने महापालिकेने कळवले आहे. त्यामुळे दंड जमा करावा लागणार हे निश्चित आहे. एका अधिकाºयाच्या चुकीमुळे महापालिकेला हा मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे मुळातच हा कर वसूल का केला गेला नाही, अपिलाचा निकाल विरोधात लागल्यानंतरही पैसे जमा का केले नाही, हे प्रश्न निर्माण होतात. त्याची चौकशी करावी व दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी मंचाचे पदाधिकारी विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी आयुक्तांकडे केली आहे.विरोधात अपील आलेच नाहीपुढे ३ वर्षे या निकालाच्याविरोधात अपीलच करण्यात आले नाही. त्यामुळे सेवा कर विभागाने मनपाला नोटीस पाठवून मूळ २ कोटी ८ लाख रुपयांवर ३ कोटी ८० लाख रुपये व्याज व २ कोटी ८ लाख रुपये दंड भरण्यास सांगितले. त्यामुळे गडबडलेल्या महापालिकेने मूळ रक्कम २ कोटी ८ लाख रुपये व ३ कोटी ८० लाख रुपये व्याज २५ सप्टेंबर २०१८ रोजी जमा करून टाकले. तसे सेवा कर विभागाला कळवले व २ कोटी ८ लाख रुपयांच्या दंडाबाबत अपील करणार असल्याचेही नमूद केले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका