शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

टँकर बनलाय ‘लुटेरा’..!

By admin | Updated: July 17, 2014 03:13 IST

शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, टँकरचालकांना सुगीचे दिवस आहेत.

पुणे : शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, टँकरचालकांना सुगीचे दिवस आहेत. महापालिकेकडून अवघ्या तीनशे रुपयांनी घेतलेले पाण्याचे टँकर सोसायट्यांना १ ते २ हजार रुपयांना विकले जात आहेत. टँकरच्या काळ्या बाजारावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने नागरिकांची लूट सुरू आहे. पुण्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली. मात्र, अद्यापही जोरदार व पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रातील पाण्याने तळ गाठला आहे. महापालिकेने टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून एकदिवस आड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही सर्व भागांत वेळापत्रकानुसार पुरेसा पाणीपुरवठा नाही. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा होणाऱ्या सोसायटींना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या महापालिकेकडून १० हजार लिटरच्या टँकरसाठी ३०० रुपयांचा पास दिला जातो. प्रत्यक्षात पासचा टँकरही हजारो रुपयांना विकला जात आहे. सध्या १५० खासगी टँकरचालक पालिकेकडून टँकर भरणा करून घेतात. त्यातून पालिकेला महिन्याला २२ लाख मिळतात. परंतु, टँकर चालक टंचाईचा फायदा घेऊन जादा रक्कम उकळत आहे. नडलेले नागरिक पैसे देऊन मोकळे होत आहेत. परंतु, पालिकेचे टँकर चालकांवर नियंत्रण नाही. वडगावशेरी, खराडी, चंदननगर, टिंगरेनगर, धानोरी, हडपसर, काळेपडळ, कोंढवा, सिंहगड रस्त्यावर पुरेसा पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी लूट सुरू आहे. (प्रतिनिधी)