शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीएवर श्रावण हर्डीकर यांच्या नियुक्तीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 20:22 IST

पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते हे पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आले होते.

ठळक मुद्देगित्ते यांनी पीएमआरडीएचे स्विकारल्यानंतर पीएमआरडीएचा एकात्मिक आराखडा केला तयार पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागपूरहून श्रावण हर्डीकर हे मार्च २०१७ मध्ये झाले दाखल विकसित नगरांची रचना आदी रचनात्मक कामे करून कमी वेळेत कामाचा उमटविला ठसा पीएमआडीएवर नियुक्तीच्या वृत्तांचे हर्डीकर यांनी केले खंडन

पिंपरी : पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते हे पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आले होते. त्याचा कालखंड पूर्ण होत आल्याने त्यावर पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या वृत्ताचे हर्डीकर यांनी खंडण केले आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर पहिले आयुक्त होण्याचा मान महेश झगडे यांना मिळाला होता. त्यानंतर त्यांची बदली झाल्याने महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी सलगी असणाऱ्या किरण गित्ते यांची नियुक्ती झाली होती. गित्ते हे त्रिपुरा केडरचे अधिकारी असून महाराष्ट्र केडरमध्ये २०१४ ला प्रतिनियुक्तीवर आले होते. पाच वर्षांचा कालखंड  पूर्ण होत असल्याने गित्ते पुन्हा त्रिपुरा केडरमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. गित्ते यांनी पीएमआरडीएचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर पीएमआरडीएचा एकात्मिक आराखडा तयार केला. हिंजवडी पुणे मेट्रोची पायाभरणीही त्यांच्याच कालखंडात झाली आणि विकसित नगरांची रचना आदी रचनात्मक कामे करून कमी वेळेत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटला होता.पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागपूरहून श्रावण हर्डीकर हे मार्च २०१७ मध्ये दाखल झाले होते. हर्डीकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या मर्जीतील आहे, अशी टीका त्यांच्यावर होत असते. हर्डीकर यांनी प्रशासकीय शिस्त लावण्याबरोबरच फ्लेक्स, जाहिरात, पार्किंग अशी विविध धोरणे आणि रचनात्मक विकासाला त्यांनी प्राधान्य दिले. एका वर्षांत सुमारे चार हजार कोटींची विकासकामे सुरू केली. स्मार्ट सिटीलाही गती देण्याचे काम केले. मात्र, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांऐवजी आयुक्तांना टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यामुळे कार्यक्षम राहूनही टीका होत असल्याने हर्डीकर अस्वस्थ आहेत. त्यामुळे पीएमआरडीएच्या रिक्त पदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. याबाबतच्या चचेर्ला उधान आले आहे. महापालिकेचे आयुक्तपद ठेऊन पीएमआरडीएचा पदभार देणार की महापालिकेतून पीएमआरडीएत बदली होणार? याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान पीएमआडीएवर नियुक्तीच्या वृत्तांचे हर्डीकर यांनी खंडन केले आहे..........

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरKiran Gitteकिरण गित्ते