शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

‘टेल्स आॅफ नेचर’मधून उलगडले जंगलाचे साम्राज्य; ‘सूत्रधार’तर्फे पुण्यात टॉक शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 6:35 PM

‘सूत्रधार’तर्फे ‘टेल्स आॅफ नेचर’ या टॉक शोचे आयोजन सेनापती बापट रस्ता येथील कलाछाया येथे करण्यात आले होते. यावेळी नागझिरा जंगलातील वास्तव्य निसर्गमित्र किरण पुरंदरे यांनी उपस्थितांसमोर उलगडले.

ठळक मुद्दे‘टेल्स आॅफ नेचर’ या टॉक शो अंतर्गत निसर्गमित्र किरण पुरंदरे यांची मुलाखतप्रत्येक मूल जन्मत:च निसर्गमित्र, त्याच्यावर बालपणीच निसर्गाचे संस्कार व्हावे : किरण पुरंदरे

पुणे : तब्बल ४०० दिवस घनदाट जंगलातील वास्तव्य...१५०० किलोमीटरचा पायी आणि १२०० किलोमीटरचा सायकलने केलेला प्रवास...जंगलात राहताना आलेले आश्चर्यकारक अनुभव...जंगलातील जैवविविधता....ऋतुमानानुसार होणारे बदल...प्राण्यांची जीवनशैली...आदिवासींचा सहवास असे संपूर्ण ४०० दिवसांचे नागझिरा जंगलातील वास्तव्य निसर्गमित्र किरण पुरंदरे यांनी उपस्थितांसमोर उलगडले. ‘सूत्रधार’तर्फे भारतीय कथाकथनाच्या विविध शैलींची ओळख करून देण्यासाठी ‘टेल्स आॅफ नेचर’ या टॉक शोचे आयोजन सेनापती बापट रस्ता येथील कलाछाया येथे करण्यात आले होते. टॉक शोअंतर्गत निसर्गमित्र किरण पुरंदरे यांची मुलाखत घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आयोजिका मधुरा आफळे, तोषल गांधी, नताशा पूनावाला, वल्लरी आपटे यांनी किरण पुरंदरे लिखीत कविता सादर केली. पुरंदरे म्हणाले, ‘जंगलात माणूस हस्तक्षेप करत नाही, त्यामुळेच ते अजूनही सुंदर आहे. एकाच पठडीत राहणे निसगार्ला मान्य नाही. त्यामुळेच जंगलात देखील प्रचंड विविधता दिसते. नागझिरा येथील ४०० दिवस हा विलक्षण अनुभव होता. तलावासाठी प्रसिद्ध असलेल्या या जंगलात ३६ हजार तलाव आहेत.’ ते म्हणाले, ‘शहराच्या पलिकडचे आयुष्य हे अतिशय सुंदर आहे. कोणत्याही कृत्रिम साधनांचा वापर न करता वास्तव्य करण्यासाठी टोकाचे वेड हवे असते. निसर्गाच्या जवळ आपण जायला हवे. त्याच्याशी संवाद साधायला हवा. प्रत्येक मूल जन्मत:च निसर्गमित्र असते. त्याच्यावर बालपणीच निसर्गाचे संस्कार व्हायला हवेत.’ यावेळी त्यांनी पावशा, भारद्वाज, रानकोंबडा अशा विविध पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढून उपस्थितांना थक्क केले. 

टॅग्स :Natureनिसर्गPuneपुणे