शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

सात बारावर नोंदीसाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात, साथीदारासह तलाठीला लाच लुचपतने केली अटक

By विवेक भुसे | Updated: November 8, 2023 11:24 IST

आजोबांनी तक्रारदार यांना बक्षीसपत्राने ३९ गुंठे जमीन दिली होती...

पुणे : बक्षीसपत्र म्हणून दिलेल्या जमिनीची नोंद सात बारावर करण्यासाठी लाच घेताना तलाठी व त्याच्या साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. तलाठी निलेश सुभाष गद्रे (वय ४२, रा. सजा सोनोरी, ता. पुरंदर) आणि खासगी व्यक्ती आदित्य मधुकर कुंभारकर (वय २१, रा. वजपुरी, ता. पुरंदर) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत एका  ३२ वर्षाच्या शेतकर्‍याने तक्रार दिली होती. त्यांच्या आजोबांनी तक्रारदार यांना बक्षीसपत्राने ३९ गुंठे जमीन दिली होती. या बक्षीसपत्राची नोंद सात बारा उतार्‍यावर करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज  सजा सोनोरी तलाठी कार्यालयास दिलेला होता. तलाठी निलेश गद्रे याने तक्रारदार यांच्याकडे बक्षीसपत्राची नोंद सात बारावर करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली.

लाच लुपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केल्यावर दिवे गाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. तक्रारदारांकडून आदित्य कुंभारकर याने ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण