शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तलाठीच झाला वाळूवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:44 IST

तलाठ्याचे ग्रामस्थांशी वर्तन अत्यंत अरेरावीचे आहेच, शिवाय तो याच परिसरात नातेवाइकाला हाताशी धरून वाळूचा उपसाही करत असल्याची लेखी तक्रार नाझरे क. प. ग्रामपंचायतीने पुरंदरच्या तहसीलदारांना दिली आहे.

जेजुरी : जेव्हा कुंपणच शेत खाते.. अशी एक म्हण प्रचलित आहे. अगदी तिचाच प्रत्यय आला आहे पुरंदर तालुक्यातील नाझरे क. प. येथील गाव कामगार तलाठ्याबाबत. या तलाठ्याचे ग्रामस्थांशी वर्तन अत्यंत अरेरावीचे आहेच, शिवाय तो याच परिसरात नातेवाइकाला हाताशी धरून वाळूचा उपसाही करत असल्याची लेखी तक्रार नाझरे क. प. ग्रामपंचायतीने पुरंदरच्या तहसीलदारांना दिली आहे.

असे बेकायदा धंदे करणाऱ्या तलाठ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे. ज्याने वाळूची तस्करी रोखवयास पाहिजे, तोच वाळूची तस्करी करीत असल्याची या परिसरात चर्चा आहे.नाझरे क.प. येथील गाव कामगार तलाठी महादेव जरांडे यांच्या ग्रामस्थांशी होत असलेल्या गैरवर्तनाबाबत नझारे क.प. ग्रामस्थांनी आज पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. तक्रारीत येथील चारुदत्त नाझीरकर हा ग्रामस्थ मुलीच्या दवाखान्यासंदर्भात उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला असता तलाठी दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले. शिवाय, त्याने ग्रामस्थांशी उद्धट वर्तन करीत कार्यालयाबाहेर हाकलून लावले.

या तक्रारीनुसार ग्रामपंचायतने थेट तहसीलदार अतुल म्हेत्रे यांच्याकडेच लेखी तक्रार दीली आहे.चौकशी करून कारवाई न झाल्यास येत्या शुक्रवार दि. १९ आॅक्टोबरपासून उपोषण आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे. तहसीलदार म्हेत्रे यांनी या तक्रारीची त्वरित दखल घेत मंडळाधिकारी ज्ञानदेव यादव यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात मंडलाधिकारी यादव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ताबडतोब चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आपणास दिले असून चौकशीची प्रक्रिया आजपासूनच राबवण्यात आल्याचे सांगीतले.ग्रामस्थांची होणारी अडवणूक, उतारे, दाखल्यासाठी हेलपाटे मारावयास लावले जाते. अरेरावी केली जाते. कायमस्वरूपी कामाच्या ठिकाणी मद्यपान करून लोकांची अडवणूक केली जाते.

याशिवाय या तलाठ्याने स्वत:च्या नातेवाइकाला हाताशी धरून जेसीबी मशीनद्वारे पांडेश्वर, जवळार्जुन, बारामती, पुरंदरलगतच्या कºहा नदी पात्रातून रात्रीच्या वेळी वाळू उपसा करत आहे. याबाबत तक्रारी अर्ज दिला तर तो फाडून टाकण्यात येतो. अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदार