शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड इन्स्टिट्युटकडून 11 लाखांची लाच घेताना वनपालाला पकडले रंगेहाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 22:46 IST

लोणावळा येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्युटच्या खासगी वनक्षेत्रातील  जागेवर केलेल्या बांधकामातील गुन्ह्यात जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी व बांधकामाला कोणताही

पुणे : लोणावळा येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्युटच्या खासगी वनक्षेत्रातील जागेवर केलेल्या बांधकामातील गुन्ह्यात जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी व बांधकामाला कोणताही अडथळा न करण्यासाठी तब्बल ११ लाख रुपयांची लाच वडगाव मावळ येथील वनविभागाच्या वनपालाने मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यात शुक्रवारी रात्री ८ वाजता त्याला सापळा रचून पकडले. वनपाल विलास बाबाजी निकल (वय ४९, रा. वडगाव मावळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्युटच्या प्रशासन अधिका-यांनी तक्रार दिली होती. इन्स्टिट्युटने लोणावळा येथे खरेदी केलेल्या गट नंबर ३१६ वर खासगी वन, अशी नोंद सातबारा उता-यावर लागली होती. त्या जमिनीबाबत वनविभागाने आक्षेप घेतला होता. त्यावर इन्स्टिट्युटने उच्च न्यायालयात केस दाखल केली होती. या गटनंबरमध्ये इन्स्टिट्युटने चरखोदकाम करून बांधकाम सुरू केले होते. त्यावरून वनविभागाच्या अधिका-यांनी इन्स्टिट्युटचे प्राचार्य व इतरांवर गुन्हे दाखल करून तेथील ठेकेदाराचे जेसीबी व इतर वाहने जप्त करून हे बांधकाम बंद केले होते. ही जप्त वाहने व जेसीबी सोडविण्यासाठी व इन्स्टिट्युटचे बांधकाम करण्यासाठी कोणताही अडथळा न करण्यासाठी वडगाव मावळ येथील वनपाल विलास निकम याने ११ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. प्रशासन अधिका-यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली़ या तक्रारीची शुक्रवारी सकाळी पडताळणी करण्यात आली. त्यानुसार सिंहगड इन्स्टिट्युटच्या लोणावळा येथील गेस्ट हाऊसमध्ये सापळा रचण्यात आला. तेथे ११ लाख रुपयांची लाच स्वीकारताना निकम याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार